Tuesday, July 23, 2024

बिग बॉसचं घर बनलं रोमांटिक हॉस्टेल, अब्दु-निमरित पासून ते साजिद-अर्चनानेही लुटला आनंद

लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रम ‘बिग बॉस’ याच्या नवीन सिजनमध्ये रोज काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक कलाकार खूप चांगल्याप्रकारे खेळत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम सतत लोकांचे मनोरंजन करत आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’ प्रेक्षकांचे मनेरंजन करण्यासाठी काहीतरी नवीन गेम घेऊन येत असतात. (दि. 27 ऑक्टोंबर) दिवशी प्रसारित झालेल्या भागामध्ये अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत.

गुरुवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये बिग बॉसने घरामध्ये हॉस्टेलचे रुप दिले आहे. घरामध्ये मुली आणि मुलांचे वेगळे हॉस्टेल बनवले असून साजिद खान (Sajid Khan) आणि अर्चना गौतम (Archana Gautam) यांना हॉस्टेलचे व्यवस्थापकामध्ये नियुक्ती केली होती. यासोबतच घरातील सगळ्या स्पर्धकांना टास्क दिला होता की, त्यांना वेग वेगळं राहूनही आपले नाते टिकवायचे आहे, आणि शेवटी जिंकणाऱ्या स्पर्धकाला विशेष बक्षिस म्हणून एक विशेष अधिकार दिला जाईल.

या टास्कमध्ये घरातील सगळेच सदस्य खूप उत्साहाने हा खेळ खेळत होते. अर्चना आणि साजिद आपली भूमिका खूप चांगल्याप्रकारे पार पाडत होते, ज्यामुळे मुले आणि मुली आपले नाते नाही बनवू शकले त्यामुळे हॉस्टेलचा कोणताच सदस्य विजेता नाही बनू शकला. त्यामुळे बिग बॉसने हॉस्टेलचे व्यवस्थापक साजिद आणि अर्चना यांनी व्यवस्थापकाचे काम चांगल्याप्रकारे पार पाडल्यामुळे त्यांना विशेष अधिकार दिला की, ‘सगळ्या घरातील व्यक्तील आपल्या मर्जीनुसार खोली वाटप करता येईल.’

हा टास्क पुर्ण करत असताना घरामध्ये रोमांटिक वातावरण झाले होते. एकीकडे बिग बॉसने बनवलेले कपल रोमांस करताना दिसले तर दुसरीकडे हॉस्टेलची मुख्यव्यवस्थापक अर्चना साजिद खानवर लाईन मारताना दिसली. या टास्कमुळे घरातेल वातावरण रोमांटिक आणि आनंदाचे झाले होते. पहिल्यांदा बिग बॉसच्या घरामध्ये एका दिवसासाठी वाद घालण्याला सुट्टी मिळाली होती. त्यामुळे प्रेक्षकांचे देखिल या भागामध्ये खूप मनोरंजन करण्यात झाले. चाहत्यांनी या भागाचा खपूच उत्सुकतेने आनंद घेतला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘बॅन करुन, कोठडीत टाका अशा’…; पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानवर भडकली इंडस्ट्री
बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, पत्नीनेच केला जिवे मारण्याचा आरोप

हे देखील वाचा