Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड अमिताभ बच्चन यांची नात असलेल्या नव्या नवेलीने नंदाच्या घरातही होतो भेदभाव, स्वतःच केला खुलासा

अमिताभ बच्चन यांची नात असलेल्या नव्या नवेलीने नंदाच्या घरातही होतो भेदभाव, स्वतःच केला खुलासा

नव्या नवेली नंदा ही एक उद्दोजिका आणि सामाजिकसेविका असून सध्या ती स्व:ताची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती बिनधास्त होऊन तिच वेगवेगळ्या विषयांवर मतं मांडत असते. मागील काही दिवसांपासून नव्याची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने घरातील महिलांबाबत होणाऱ्य़ा भेदभावाबद्दल सांगितले आहे. तिच्या घरातही तिने अशाच भेदभावाचा सामना केला असल्याचे सांगितले आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मुलीची श्वेता नंदाची (Shweta Nanda) मुलगी असलेली (Amitabh Bachchan’s grand daughter) नव्या नवेली नंदाने (Navya Naveli Nanda) बॉलिवूडशी एवढा जवळचा संबंध असूनही तिने बॉलीवुडमध्ये प्रवेश केला नाही. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसूनही नव्या नेहमीच प्रकाशझोतात असते. तिने एका मुलाखतीमध्ये तिच्या घरात होणाऱ्य़ा भेदभावाबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

Photo Courtesy: Instagram/navyananda

मुलाखतीमध्ये तिने सांगितले आहे की, “मी माझ्या घरीसुद्धा असा भेदभाव अनुभवला आहे. जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा माझी आई मला म्हणते हे घेवून ये, ते घेऊन ये. घरात काम करणाऱ्या नोकरासारखी भूमिका मला त्यांच्यासमोर बजावावी लागते. ती म्हणते ते मी समजू शकते परंतु हेच काम माझा भाऊ अगस्त्या पण करू शकतो, परंतु माझी आई त्याच्याकडून काहीच करुन घेत नाही.”

नव्या पुढे म्हणते, “जेव्हा तुम्ही एकत्रित कुटंबात राहता तेव्हा या गोष्टी घडणे साहजिकच आहे. मुलींना नेहमीच घर कसे चालवायचे, पाहुण्यासमोर कसे वागायचे हे शिकवले जाते. मी आजपर्यंत बघितलं नाही माझ्या भावासोबत आईने असं वागले. तरुण मुलांना या गोष्टी का शिकवल्या जात नाही. जेव्हा तुम्ही मुलींना या गोष्टी शिकवत असता तर मुलांना का शिकवत नाही? कदाचित मुलींना आधीपासूनच सांगितले जाते की घर सांभाळण्याची जबाबदारी मुलींचीच असते.”

Photo Courtesy: Instagram/navyananda

नव्या नंदाच्या या वक्तव्यावर जोया अख्तर आणि एक्ट्रेस तिलोत्तमा शोमेने तिचे कौतुक केले आहे. या आधीही नव्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, घरातील महिला कुटुंबाच्या स्वास्थ्यकडे जास्त लक्ष देतात. परंतु स्व:ताच्या शरिराकडे दुर्लक्ष करतात. या गोष्टी मी माझ्या आईला आणि आजीलाही करताना बघितले आहे. नव्या नवेली प्रोजेक्ट नवेलीची निर्माती असून, आरा हेल्थची को-फाउंडर आहे. नव्याची नवेली एक नॉन प्रॉफिट संस्था असून, ही संस्था महिलांच्या समानतेसाठी काम करते सोबतच महिलांना सशक्त बनवण्यासाठी मदत करते.

हेही वाचा :

हे देखील वाचा