Tuesday, June 24, 2025
Home साऊथ सिनेमा ‘मला साऊथचा अभिनेता म्हणू नका’, सुपरस्टार धनुषने नेटकऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कारण

‘मला साऊथचा अभिनेता म्हणू नका’, सुपरस्टार धनुषने नेटकऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कारण

सिने जगतात सध्या बॉलिवूड आणि टॉलिवूडचा वाद बऱ्याच काळापासून रंगलेला दिसत आहे. सध्या दाक्षिणात्य सिनेमांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी सिने जगत आणि दाक्षिणात्य सिने जगत असा वाद सोशल मीडियावर रंगला आहे. या वादात आत्तापर्यंत अनेक टॉलिवूड तसेच बॉलिवूड कलाकारांनी टिकास्त्र सोडलेले पाहायला मिळाले होते. आता याच विषयावर अभिनेता धनुषने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, साऊथचा सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी ‘द ग्रे मॅन’ या हॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, धनुषने त्याला ‘दक्षिणात्य अभिनेता’ म्हणून ओळखले जाऊ नये अशी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे.  त्याचवेळी धनुषने दाक्षिणात्य  किंवा प्रादेशिक चित्रपटांऐवजी आपण एकत्र एक मोठी इंडस्ट्री बनवावी आणि राष्ट्रीय चित्रपट बनवावेत असे मला वाटते, अशीही इच्छा व्यक्त केली आहे.

याबद्दल बोलताना धनुषने पुढे सांगितले की, आम्हाला साऊथ किंवा नॉर्थ अभिनेते म्हणण्याऐवजी प्रत्येकजण आम्हाला भारतीय अभिनेते म्हणेल, तर मी त्याचे कौतुक करेन. आपण सर्वांनी एकत्र येऊन मोठी सिनेसृष्टी उभारण्याची हीच वेळ आहे. हा एक मोठा उद्योग आहे. आपण सर्वांनी एकत्र काम करून केवळ दक्षिण, उत्तर किंवा प्रादेशिक उद्योगच नव्हे तर राष्ट्रीय चित्रपट सर्वांसाठी बनवले तर खूप चांगले होईल.

OTT प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना धनुष म्हणाला, “प्रत्येक चित्रपट प्रत्येकासाठी बनवला जातो, विशेषत: डिजिटल प्लॅटफॉर्मवर. आता प्रत्येकजण प्रत्येकाचे काम पाहू शकतो आणि त्याच्या प्रतिभेचीही माहिती मिळते. अभिनेता म्हणून आमच्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. तुम्ही चांगले काम करत असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. त्यामुळे आता मला किंवा इतर कुणाला साऊथचा अभिनेता म्हणावं असं काही वाटत नाही. आम्ही फक्त भारतातील कलाकार आहोत,”  दरम्यान धनुषच्या या वक्तव्याची  सिने जगतात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, धनुष व्यतिरिक्त ‘द ग्रे मॅन’ चित्रपटात ख्रिस इव्हान्स आणि रायन गोसलिंग यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 22 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ‘द ग्रे मॅन’ हा धनुषचा दुसरा हॉलिवूडपट आहे. यापूर्वी, धनुष 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ फकीर’ या  गाजलेल्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. रोमन प्युर्टो लास यांच्या ‘द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ द मिस्टिक’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.

हेही वाचा-  डॉक्टर हाथी ते नट्टूकाका, यशाच्या शिखरावर असतानाच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी घेतला जगाचा निरोपएकाच धक्क्याने ‘या’ सेलिब्रिटींचा खेळ झाला खल्लास! कुणाचा डोळा गेला, तर कुणाच्या सौंदर्याला लागली नजर‘तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला’, रणवीर सिंगच्या न्यूड फोटोवर शर्लिन चोप्राची प्रतिक्रिया

हे देखील वाचा