Tuesday, March 10, 2026
Home अन्य कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या अभिनेत्रीच्या कारचा अपघात!

कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या अभिनेत्रीच्या कारचा अपघात!

पश्चिम बंगालमध्ये एसएससी भर्ती घोटाळ्यात अडकलेल्या अभिनेत्री अर्पिता मुखर्जीला (Arpita Mukherjee) घेऊन जाणाऱ्या कारला अपघात झाला आहे. सुदैवाने हा अपघात फार मोठा झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टातील सुनावणीनंतर ईडी अर्पिता मुखर्जीसोबत सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये जात होती. यादरम्यान तिच्या कारचा अपघात झाला. या अपघातात अर्पिता मुखर्जी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे, अर्पिता मुखर्जी ही ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची आहे. पश्‍चिम बंगालमधील शिक्षक भर्ती घोटाळ्याप्रकरणी छापा टाकून तिच्या राहत्या घरातून २० कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. (arpita mukherjee car accident know update)

काय आहे प्रकरण?
पार्थ चॅटर्जीला २३ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. २६ तासांच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली. हे प्रकरण शिक्षक भर्ती घोटाळ्याशी संबंधित आहे. पार्थ चॅटर्जीच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या अर्पिता मुखर्जीच्या घरावर ईडीने शुक्रवारी छापा टाकला. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग भरती घोटाळ्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात अर्पिताच्या घरातून सुमारे २० कोटींची रोकड जप्त करण्यात आली. चौकशीनंतर ईडीने प्रथम तिला ताब्यात घेतले. तिची तार पार्थ चॅटर्जीशी जोडली गेली, त्यानंतर मंत्र्यालाही अटक करण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा