देशभरात सध्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा केला जात आहे. आज भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशातील प्रत्येक व्यक्ती देशभक्ती दाखवताना दिसत आहे. 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या या सेलिब्रेशनची रंगत बॉलीवूड इंडस्ट्रीतील स्टार्सवरही आहे. काही सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीवर तिरंग्याचा फोटो टाकून हा ऐतिहासिक दिवस साजरा करत आहेत, तर काही स्टार्स त्यांच्या ट्विटर हँडलवर फोटो शेअर करत आहेत. सध्या तिच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री तापसी पन्नूचे (Tapsee Panuu) नावही या स्टार्समध्ये सामील आहे.
भारताचा स्वातंत्र्यदिन सध्या जल्लोशात साजरा होताना दिसत आहे. याचनिमित्ताने अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देशाच्या ध्वजाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपल्या ध्वजावरील अशोक चक्राचे महत्त्वही स्पष्ट केले आहे. हे छायाचित्र शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक नोटही लिहिली, ज्यामध्ये “तिने देशवासियांना द्वेष संपवण्याचा सल्ला दिला.”
Darkness cannot drive out darkness, only light can do that. Hate cannot drive out hate, only love can do that. और प्यार कैसे साबित किया जाता है …… प्यार कर के । Happy 75 years to our India, May we keep making her proud by being honest with that love ????????❤️ #HappyIndependenceDay pic.twitter.com/8yH1RU9f8U
— taapsee pannu (@taapsee) August 14, 2022
अभिनेत्रीने लिहिले की, “अंधार अंधार दूर करू शकत नाही, फक्त प्रकाश हे करू शकतो. द्वेष द्वेष दूर करू शकत नाही, फक्त प्रेम ते करू शकते आणि प्रेम प्रेम केल्याने सिद्ध होते. आपल्या भारताला स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या प्रेमाप्रती प्रामाणिक राहून आपण नेहमी आपल्या देशाचा अभिमान वाढवत राहू अशी आशा आहे.
हेही वाचा –
चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली शशिकाला, ‘या’ करणामुळे लोकांच्या घरी करावा लागला झाडू-पोछा
प्रियांका चोप्रा ते सुष्मिता सेन, बॉलिवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींच्या वडिलांनी केली आहे देशसेवा
महिलेला फसवल्यामुळे ‘हा’ कलाकार सापडला कायद्याच्या कचाट्यात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल