बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग याने त्याची पत्नी म्हणून जवळपास १३-१४ वर्षांपासूनची मैत्रीण आणि अभिनेत्री आकांक्षा पुरी हिची निवड केली होती. आता हीच आकांक्षा सोशल मीडियावर तिच्या अदांनी सर्वांना दीवाना बनवत आहे. तिचे एक फोटोशूट भलतेच चर्चेत आले आहे. या फोटोंमुळे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.
अभिनेत्री आकांक्षा पुरी (Akanksha Puri) ही इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. तसेच, तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. ती या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. तिचे चाहते तिच्या या पोस्टला पसंती दर्शवताना दिसत आहेत.
View this post on Instagram
मिकाने व्यक्त केले आकांक्षावरील प्रेम
आकांक्षा हिने तिच्या कातिलाना अंदाजाने प्रत्येकाला आपल्या प्रेमात पाडले आहे. तिच्या या फोटोवर चाहते फायर इमोजी पोस्ट करत आहेत. तसेच, तिची जोरदार प्रशंसाही करत आहेत. इतकेच नाही, तर मिकानेही या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तसेच, एका चाहत्याने “शेवटी तू मारलेच,” असे लिहिले आहे.
View this post on Instagram
पारस छाब्रासोबत झाले होते ब्रेकअप
आकांक्षा पुरी गेल्या १३-१४ वर्षांपासून मिका सिंगची चांगली मैत्रीण आहे. मात्र, यादरम्यान तिने अनेक अभिनेत्यांना डेट केले आहे. यामध्ये पारस छाबरा याचे नाव आघाडीवर आहे. या दोघांनी ‘विघ्नहर्ता गणेश’ या टीव्ही शोमध्ये एकत्र काम केल्याचे बोलले जाते. हे दोघे दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या हातावर टॅटूही होता. मात्र, ‘बिग बॉस १३’चा भाग बनताच दोघांच्या नात्यात माहिरा शर्मा नावाची भिंत आली, आणि त्यांचे ब्रेकअप झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अभिनेत्री कंगना रणौतने पंतप्रधान मोदींवर उधळली स्तुतिसुमने; म्हणाली, ‘हा माणुस…’
अक्षय कुमार बॉयकॉटवर बोललाच; म्हणाला, ‘लोकांच्या खोडसाळपणामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेची…’
प्रियांका चोप्रा ते सुष्मिता सेन, बॉलिवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींच्या वडिलांनी केली आहे देशसेवा