बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या पिळदार बॉडीसाठी तसेच एक्शनसीन साठी प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यंत केलेल्या सर्व चित्रपटांमध्ये त्याची एक्शन स्टाइल चर्चेत राहिली आहे. लोकांना त्याची धडधाकट शरीरयष्टी आणि चित्रपटांमधील खरीखुरी अॅक्शन आवडते. या अभिनेत्याने आता इंस्टाग्रामवर लाल रंगाच्या शॉर्ट्समध्ये आपली आकर्षक शरीरयष्टी दाखवली आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ समुद्र किनाऱ्यावर वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. टायगरने सुमारे 3 तासांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर 1.5 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही या अभिनेत्याच्या देखण्या लूकचे कौतुक केले आहे. टायगरचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.टायगरने व्हिडिओसोबत ‘मला माझा रेड शॉर्ट आवडतो, असा कॅप्शन दिला आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अभिनयाइतकाच सध्या दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आला आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, दोघे खूप दिवसांपासून मित्र होते, परंतु टायगरला त्याच्या आयुष्याचे आणि फिटनेसचे इतके वेड आहे की तो या नात्याला आवश्यक वेळ देऊ शकत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सुरुवातीपासूनच याबाबत स्पष्ट होता. दिशाला आशा होती की शेवटी काही घडेल, पण तसे होत नव्हते.
दरम्यान टायगरने त्याचे पालक, जॅकी श्रॉफ आणि आयेशा श्रॉफ यांच्यापासून वेगळे राहायला सुरुवात केली तेव्हापासून हे लव्हबर्ड जवळजवळ एकत्र राहत होते. ते बरेच दिवस एकत्र होते आणि दिशाला वाटू लागले की त्यांनी लग्न करावे. टायगरला हे सांगताच त्याने टाळले. टायगरने आकांक्षा शर्माशी जवळीक केल्यामुळे दिशा पटानीपासून फारकत घेतल्याच्याही चर्चा आहेत.
हेही वाचा –
भल्या भल्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते पाकिस्तानची ‘ही’ सुंदरी, फोटो पाहून फुटेल घाम
लेखकाला दुसरं काही सुचत नाही का? यामुळे ‘मुलगी झाली हो’ मालिकेवर संतापले प्रेक्षक
बलात्कार पिडितेच्या अन्यायाची कहाणी, ‘सिया’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टिझर एकदा पाहाच