Wednesday, March 4, 2026
Home हॉलीवूड प्रसिद्ध गायिकेविरुद्ध गाणे चोरल्याचा आरोप, लेखिकेने ठोकला ‘एवढ्या’ कोटींचा खटला

प्रसिद्ध गायिकेविरुद्ध गाणे चोरल्याचा आरोप, लेखिकेने ठोकला ‘एवढ्या’ कोटींचा खटला

प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार टेलर स्विफ्ट हिच्याबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी वाचून तिच्या चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एका लेखिकेने आरोप लावला आहे की, टेलर स्विफ्ट हिने तिचा प्रसिद्ध ‘लव्हर’ या अल्बममध्ये जी गाणी गायली आहेत, ती गाणी चोरीची आहेत. इतकेच नाही, तर लेखिकेने गायिकेवर १ मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ८ कोटी रुपयांचा खटलाही दाखल केला आहे.

टेलर स्विफ्ट (Taylor Swift) हिने ‘लव्हर’ हे अल्बम सन २०१९ मध्ये प्रदर्शित केले होते. तिचा हा अल्बम आजही भारतासह जगभरातील चाहते आवडीने ऐकतात. टेलरवर साहित्य चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. लेखिका टेरेसा ला डार्ट हिचा आरोप आहे की, तिने सन २०१० मध्ये आलेल्या पुस्तकातील कविता, कहाणी आणि फोटो चोरत गायिकेने तिच्या अल्बममधील गाणे बनवले आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, टेलरविरुद्ध हा खटला २३ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taylor Swift (@taylorswift)

टेनेसीच्या फेडरल कोर्टात गुन्हा दाखल
सहा पानांच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, टेरेसा ला डार्ट हिच्याकडून ८ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा खटला दाखल केला जात आहे. टेरेसाने कथितरीत्या अमेरिकेच्या टेनेसीमधील एका फेडरल कोर्टात याबाबत तक्रार नोंदवली आहे. यामध्ये टेलर स्विफ्टवर ‘कविता, कहाणी आणि फोटो’ या गोष्टी तिच्या पुस्तकातून चोरी करण्याचा आरोप लावण्यात आलाय.

टेलरने जिंकलेत ११ ग्रॅमी पुरस्कार, ५८ जागतिक विक्रमांची नोंद
दुसरीकडे, गायिका टेलर स्विफ्ट हिने साहित्य चोरीच्या आरोपांचे खंडन केले आहे. पेन्सिल्वानियामध्ये जन्मलेली टेलर वयाच्या १४व्या वर्षापासून गायन करत आहे. तिने आतापर्यंत ११ ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. तिच्या नावावर एक ऍमी पुरस्कार, ३४ अमेरिकन संगीत पुरस्कार, २९ बिलबोर्ड संगीत पुरस्कार आणि ५८ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड दाखल आहेत. तिच्या चाहत्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अपना टाईम लाया है! नवाजुद्दीनला करावी लागली होती वॉचमनची नोकरी, आज आहे बॉलिवूडचा महागडा सुपरस्टार
सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, तुटलेल्या हृदयासोबत अभिनेत्याने शेअर केली भावूक पोस्ट
आधी बला’त्कार, नंतर हत्या? सोनालीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे, खुनाचा गुन्हा दाखल

हे देखील वाचा