मिया खलिफा त्या अभिनेत्रीमधील एक आहे, ज्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंनी ती नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांना प्रभावित करत असते. यासोबतच ती चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन देखील करत असते. अशातच इंस्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून सगळेच दंग झाले आहेत. मियाने तिचा रडतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हॉलिवूड गायक टेलर स्विफ्टवर तिचे आयुष्य खराब केल्याचा आरोप लावताना दिसत आहे.
मियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊया तिने एवढा मोठा आरोप का केला आहे? मिया खलिफाने नुकतेच टेलर स्विफ्टचे ‘ऑल टू वेल’, हे गाणे ऐकून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘ऑल टू वेल’ टेलर स्विफ्ट एक री-रेकॉर्डेड व्हर्जन आहे. जे या आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झाले होते. दहा मिनिटांचे हे गाणे एका शॉर्ट फिल्मप्रमाणे आहे. ज्याला टेलर स्विफ्टनेच दिग्दर्शित केले आहे. (Mia khalifa breaks down said Taylor Swift ruined my life in Instagram video)
ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की, मिया खलिफा टेलर स्विफ्टची खूप मोठी चाहती आहे. ही काही पहिली वेळ नाहीये, जेव्हा मीया सोशल मीडियावर टेलरला काही बोलली आहे. तिचा रडताना व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “ऑल टू वेल या दहा मिनिटाच्या गाण्यासोबत टेलर स्विफ्टने माझे आयुष्य खराब केले आहे.” मियाने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता, जो आता तिने डिलीट केला आहे.”
टेलर स्विफ्टने नुकतेच आपल्या रेड अल्बमला पुन्हा एकदा रेकॉर्ड केले आहे. टेलरचे ‘ऑल टू वेल’ हे गाणे प्रदर्शित झाले तेव्हापासून त्याचे चाहते आणि अनेक कलाकार यावर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. टेलरचे हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. कारडी बीने या गाण्यावर प्रतिक्रिया देत सांगितले होते की, त्याला हे गाणे खूप आवडले आहे.
ग्रेसिया अबरामने त्याच्या ट्वीटमध्ये या गाण्याबाबत त्याची प्रतिक्रिया देत सांगितले होते की, “हाई टेलर स्विफ्ट मी फक्त एवढंच म्हणेन की, मी आशा करते की, तुम्ही खुश असाल कारण १० मिनिटांचे हे गाणे ऐकून हृदय तुटले आहे. मी तुझ्या मिठीचा अनुभव घेऊ शकत नाही आणि माझ्या हृदयाची गती असामान्य आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.” अशाप्रकारे अनेक कलाकार आणि चाहते या गाण्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा