एक विदेशी डान्स ग्रूपचा ‘काला चश्मा’ या गाण्यावरचा डान्स परफॉरमंस खूप व्हायरल झाला होता. या डान्स परफॉर्मन्सवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत होते. अशात आता हा डान्स ग्रूप पुन्हा एका मजेदार डान्स व्हिडिओसह चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ‘द क्विक स्टाईल’ नावाच्या इंस्टा पेजवरून व्हायरल झाला आहे. व्हिडिओ आतापर्यंत लाखाे लाेकांनी पाहिला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण बघू शकताे की, सर्वांनी आपापल्या डाेळ्यावर चष्मा लावला आहे. जसे म्युझिक सुरू हाेते, तसे सर्व मुलं अक्षय कुमारच्या ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करायला लागतात.
डान्स व्हिडिओमध्ये मुलांची एनर्जी पाहण्यासारखी आहे. या मुलांचे मजेदार डान्स स्टेप्स बघून पाहण्याऱ्यालाही ठुमके लावावेसे वाटतील. एका युजरने या पाेस्टवर कमेंट करत लिहिले की, “मज्जा आली व्हिडिओ बघून.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सर्वांचा आपला आपला वेगळा स्वॅग आहे.” तसेच आणखी एका युजरने लिहिले की, “व्वा काय मूव्हज आहेत.”
View this post on Instagram
एका युजरने कमेंट करत लिहिले, “हे लाेक मज्जा करत आहे यार.” एका चाहत्याने लिहिले की, “कृपया बॉलिवूड गाण्यावर आणखी व्हिडिओ बनवा.” त्यातच एका युजरने लिहिले की, “आपण उत्तम आहात! हे गाण देखील नक्कीच धुमाकूळ घालेल.”
याआधीही या विदेशी मुलांचा ‘काला चश्मा’ या गाण्यावरचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस उतरला हाेता. त्यावर सुद्धा प्रेक्षकांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला हाेता. पाकिस्तानच्या एका लग्न समारंभात देखील या मुलांनी डान्स परफाॅर्मन्स करून वाहवा मिळवली होती. मुलांच्या या डान्स ग्रूपमुळे साेशल मीडियावर खळबळ माजली आहे, असे म्हणण वावगे ठरणार नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
लग्नापूर्वी ऐश्वर्यासाठी ‘हा’ अभिनेता होता इंडस्ट्रीतील ‘सेक्सी’ पुरुष; अभिनेत्रीने कुणाचे घेतलेले नाव?
मुनव्वर फारुखीसोबतच्या प्रेमप्रकरणावर अंजलीचा पहिल्यांदाच मोठा खुलासा; म्हणाली, ‘त्याला माझ्यात काहीच…’
‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचे अनेकांनी केले कौतुक, पण विवेक अग्निहोत्री यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने वेधले लक्ष