‘नागिन’, ‘मेरे डॅड की दुल्हन’, ‘जाने क्या बात हुई’, ‘परवरिश- कुछ खट्टी कुछ मीठी’ यासारख्या दमदार मालिका देणारी श्वेता तिवारी जवळपास दाेन वर्षानंतर पुन्हा एकदा छाेट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या दरम्यान, ती एका रियॅलिटी शाेमध्ये देखील दिसली हाेती. मात्र, श्वेता टीव्ही शाे ‘मैं हु अपराजिता’ या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. श्वेताने शाेविषयी सांगत असताना आपल्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आपल्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. माध्यमांशी संवाद साधताना तिला विचारण्यात आले की, “लग्नाबद्दल आज तुझे काय विचार आहे?” यावर श्वेताने स्पष्टपणे सांगितले की, “मला लग्नावर विश्वास नाही. इतकंच नाही, तर मी माझ्या मुलीला देखील सांगते की, लग्न नकाे करू.”
श्वेता तिवारी म्हणाली, “ते तिचे आयुष्य आहे, त्यामुळे मी तिला सांगणार नाही की, तिने कसे जगावे. मात्र, मला असे वाटते की, तिने काेणतीही उडी मारायच्या आधी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जर तुम्ही एका रिेलेशनशिपमध्ये असाल, तर असं अजिबात गरजेचं नाही की, ते नातं तुम्ही लग्नात बदलावं.” श्वेता पुढे म्हणाली की, “आयुष्यात लग्न करणं फार गरजेचं आहे आणि लग्नाविना जीवन कसे चालेल हे व्हायला नकाे.”
View this post on Instagram
“प्रत्येक लग्न वाईट नसतं. माझे बरेच असे मित्र आहेत, जे लग्न करून आंनदी आहेत. मात्र, मी बऱ्याच अशा लाेकांना पाहिले आहे, जे लग्न इच्छा नसताना टिकवतात, जे त्यांच्या आणि त्यांच्या मुलांसाठी ठीक नाही. म्हणून मी माझ्या मुलीला समजावते की, तिने तेच करावे ज्यात तिला आनंद मिळेल. तिने समाजाच्या कुठल्याही दबावाखाली येऊन लग्न करू नये,” असे पुढे बोलताना श्वेताने सांगितले. तिने असेही सांगितले की, तिला पार्टनर नसल्याची कमतरता कधी जाणवत नाही.
श्वेता तिवारीविषयी बाेलायचे झाले तर, तिने ‘कसाैटी जिंदगी की’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली हाेती. त्यानंतर श्वेता ‘बिग बाॅस सिझन 4’ची विजेता देखील हाेती. श्वेताची लेक पलकने नुकतेच बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ती हार्डी संधूचा अल्बम ‘बिजली बिजली’मध्ये दिसली हाेती, जाे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला हाेता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अरर, हे काय नवीनच! पंक्चर झाल्यामुळं अभिनेत्यानं थेट रिक्षातच भरली सायकल, तुम्ही ओळखलं का?
अडचणी जॅकलिनचा पिच्छा सोडेना! आता काय घडलंय जाणून घ्यायचंय? वाचा ही बातमी
शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रुपेरी पडदाच नाही, तर ओटीटीवरही दाखवणार अभिनयाची जादू










