Thursday, April 25, 2024

अरर, हे काय नवीनच! पंक्चर झाल्यामुळं अभिनेत्यानं थेट रिक्षातच भरली सायकल, तुम्ही ओळखलं का?

अभिनेता फरहान अख्तर याने इंस्टाग्रामवर एक एक अद्वितीय फाेटाे शेअर केला आहे. या फाेटाेमध्ये ताे हातात सायकल पकडून रिक्षामध्ये बसल्याचे दिसत आहे. फरहानने हेल्मेट देखील घातले आहे. त्याच्या या फोटोवरून अनेक चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, त्याने सायकल असूनही रिक्षाची मदत का घेतली? चला तर जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण…

फरहान अख्तर इंस्टाग्राम पोस्ट
हा फोटो शेअर करत फरहान अख्तर (Farhan Akhtar) याने लिहिले की, “सायकलचा टायर पंक्चर झाल्याने रविवारची सायकलिंग अर्धवट राहिली. आता रिक्षाने घरी जाताना प्रवासाचा आनंद घेण्याची वेळ आहे.” या फाेटाेवर फरहान अख्तरची बहीन झोया अख्तर हिने कमेंट केली. त्याचबराेबर अभिनेता ईशान खट्टरने देखील प्रतिक्रिया दिली.

खरं तर, फरहान अख्तर रविवारी सायकलने फिरायला निघाला हाेता. मात्र, सायकलचा टायर पंक्चर झाल्याने फरहानला रिक्षात बसून घरी परत जावे लागले. याचा फाेटाे त्याने इंस्टाग्रामवर पाेस्ट केला आहे. तिथेच चाहत्यांनी त्याच्या फाेटाेवर वेगवेगळ्या कमेंट केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

यासोबतच चाहत्यांनी फरहान अख्तरला ‘धूम 3’ या चित्रपटाबद्दल विचारत लिहिले की, “कुणी सांगेल का धूम 3 कधी येणार आहे?” यासोबतच काही युजर्सनी मजेशीर कमेंट करत लिहिले की, “रिक्षावाला तर विचारत नाही ना की, धूम 3 कधी येणार?” ‘धूम 3’ सिनेमाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे.

फरहान अख्तरने 2011 साली अमिताभ यांच्या ‘डॉन’ या हिट चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यास सुरुवात केली होती. या चित्रपटात शाहरुख खान डॉनच्या भूमिकेत दिसला होता. 2011 सालापासून डॉन फ्रँचायझीचे 2 भाग आले आहेत. त्याचबरोबर तिसरा भागही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच ‘डॉन 3’साठी शाहरुख खानची चर्चा होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, यावेळी त्यांनी काम थांबवले आहे.

फरहान अख्तरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच Disney + सीरिज ‘मिस मार्व्हल’मध्ये दिसणार आहे. याआधी फरहान राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘तुफान’ या चित्रपटात दिसला होता. यासोबतच तो ‘जी ले जरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफसह आलिया भट्टही दिसणार आहे. मात्र, हा चित्रपट काही कारणास्तव स्थगित ठेवण्यात आला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अडचणी जॅकलिनचा पिच्छा सोडेना! आता काय घडलंय जाणून घ्यायचंय? वाचा ही बातमी
शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रुपेरी पडदाच नाही, तर ओटीटीवरही दाखवणार अभिनयाची जादू
परदेशी डान्स ग्रूपने ‘तू चीज बड़ी है मस्त मस्त’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहिला का?

हे देखील वाचा