हॉलिवूड टीव्ही कार्यक्रमातील लोकप्रिय अभिनेता ‘हार्टलैंड’ फेम रॉबर्ट कॉर्मियर (Robert Cormier) याने अनेक कार्यक्रमामध्ये आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. मात्र, या अभिनेत्याला अगदी तरुण वयातच आपला जीव गमवावा लागला. अचानकच झालेल्या निधनाने सगळेज खूपच हैराण झाले आहेत.
रॉबर्ट कॉर्मियर(robert cormier) या अभिनेत्याने अनेक टीव्ही कार्यक्रमामध्ये काम केले होते मात्र, त्याला खरी ओळख ‘हार्टलैड’ या मालिकामुळे मिळाली होती. या अभिनेत्याला ‘अमेरिकन गॉड्स’, ‘हार्टलैंड’ आणि ‘स्लेशर’ सारख्या कार्यक्रमासाठी ओळखले जात होते. अचानकच त्याच्या सोबत एक घटना घडली आणि त्याच्या आयुष्याने त्याला साथ दिली नाही आणि अगदी 33 व्यावयातच त्याने जगाला निरोप दिला. त्याच्या या दु:खद निधनाला पाहून सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत. त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे रॉबर्टला चाहत्यांनी भावनिक श्रद्धांजली दिली आहे.
रॉबर्ट कॉर्मियर हा एका चांगल्या अभिनेत्यासोबत खूपच चांगला व्यक्ती होता. रॉबर्टला खूप चांगल्या सवयी होत्या, तो नेहमी लोकांची मदत कण्यासाठी पुढे येत असे. तो कुटुंबासोबतच मित्रामध्येही खूप सक्रिय होता. रॉबर्टला कोणताही आजार नव्हता त्याच्या मरणाचे कारण म्हणजे तो अचानक पडला आणि त्या अपघातामुळेच त्याचे निधन झाले.
‘हार्टलैंडने’ वाहिली श्रद्धांजली
रॉबर्टच्या या दु:खद निधनावर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. यासोबतच हार्टलैंडनेही आपले दु:ख व्यक्त केले आहे. हार्टलैडने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन ट्विट करत लिहिले आहे की, “रॉबर्ट कॉर्मियर यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर आम्हाला खूपच दु:ख झाले आहे. त्याला दोन सिजनपासून हार्टलैडसाठी निवडले होते त्यामुळे तो हार्टलैंडचा प्रिय सदस्य आहे. या कार्यक्रमातील कलाकार आणि क्रू यांच्यातर्फे, या दु:खद काळासाठी आम्ही तुमच्या कुटुंबासोबत आहोत.”
अनेक कर्यक्रमामध्ये केल्या होत्या भूमिका
रॉबर्ट कॉर्मियर याने आपल्या करिअरमध्ये गेस्ट अपीरिअंस ( अतिथी देखावा) असणाऱ्या भूमिका निभावल्या होत्या. यानंतर त्याने साल 2019 मध्ये वेबसिरिजमध्ये काम केले होते. नेटफ्लीक्सवर प्रदर्शित होणारी थरारक वेबसिरिज ‘स्लेशर’ च्या सात भागामध्ये नशिबात जंकी किट जनिंग्स सारख्या भूमिका निभावल्या होत्या. यानंतर तो 2021 मध्ये कॅनडीयन कार्यक्रम हार्टलैंडमध्ये झळकला होता,त्याची ही मालिका खूपच गाजली होती. नशिबात जंकी किट जनिंग्स सारख्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने आपले शिक्षण टोरंटो मध्ये पूर्ण केले होते.
We are deeply saddened to learn of the passing of Robert Cormier. He was a beloved member of the Heartland cast the last two seasons. On behalf of the Heartland cast and crew, our thoughts are with him and his family during this difficult time.
— Heartland (@HeartlandOnCBC) September 27, 2022
माध्यमातील वृत्तानुसार त्याच्या कुटुंबाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “रॉबर्टला दुसऱ्यांची मदत करायला खूपच आवडत होते. त्याला नेहमीच आपल्या आयुष्यात जास्तच मिळवण्याची सवय होती. त्याने आपल्या आयुष्यात कुटुंबापासून ते मित्रापर्यंत सगळ्यांनाच प्रभावित केले होते. कला विश्वात आणि त्याच्या बहिणीसोबत तो नेहमीच जिवंत राहिल कारण रॉबर्टसाठी त्याच्या बहिणीच सगळंकाही होत्या. त्याच्या कुटुंबात तीन बहिणींसोबत आई-वडील आणि आजी राहत आहेत. रॉबर्ट कॉर्मियर या अभिनेत्याचा राहत्याघरी अंतिम संस्कार करण्यात आला.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
मॉडेल, डान्सर अन् डॉक्टर! मल्टिटॅलेंटेड धनश्री वर्मा आहे ‘या’ कंपनीची मालकीण
आलियाने रणबीरला दिले खास बर्थडे गिफ्ट! ‘टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा’साठी झाली निवड
काय सांगता! शिल्पा शेट्टीला कार चालवायची वाटते भिती, अभिनेत्रीबद्दल ‘या’ खास गोष्टी जाणून व्हाल थक्क










