Wednesday, April 22, 2026
Home बॉलीवूड आलियाने रणबीरला दिले खास बर्थडे गिफ्ट! ‘टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा’साठी झाली निवड

आलियाने रणबीरला दिले खास बर्थडे गिफ्ट! ‘टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा’साठी झाली निवड

आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष खूप लकी आहे. हे वर्ष अभिनेत्रीसाठी केवळ वैयक्तिकच नाही तर व्यावसायिक दृष्टीनेही खूप खास आहे. अभिनेत्रीला रणबीर कपूरच्या रुपात जीवनसाथी मिळाला आणि आता ती आई होणार आहे.  इतकेच नाहीतर ती सध्या तिच्या ‘ब्रह्मास्त्र‘ चित्रपटाच्या यशाचा आनंद देखील घेत आहे. या दरम्यान, आलियासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.

आलिया (Alia Bhatt) हिची टाईम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड (Time 100 Impact Award)साठी निवड झाली आहे. स्वत: अभिनेत्रीने तिचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला, तर आई सोनी राजदानच्या आनंदाला थारा नव्हता. आज रणबीर कपूर(Ranbir Kapoor) याचा ही वाढदिवस आहे, अशात आलिया भट्टने अभिनेत्याला तिच्या प्रोफेशनल फ्रंटचे यशाच्या रूपाने एक भेट दिली आहे.

एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन आलियाने आपली खास ओळख निर्माण केली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’, ‘डार्लिंग्स’ यासारख्या अनेक दमदार चित्रपटात तिनं काम केलं आहे. पण ‘ब्रह्मास्त्र’मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयानंतर आलियाची  बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणना हाेत आहे. आलियाने ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले आहे. चित्रपट क्षेत्रातील या योगदानाबद्दल अभिनेत्रीला टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

दिया मिर्झासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीनी केलं आलियाच अभिनंदन
आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर एक पाेस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. आलियाच्या योगदानाचे वर्णन करताना टाईमने लिहिले की, “आलिया भट्टने तिच्या दमदार अभिनयामुळे आधुनिक स्त्रीची प्रतिमा मिळवली आहे.” आलियाच्या व्यावसायिक फ्रंट यशाबद्दलची माहिती मिळताच, तिची आई आणि वेट्रेन अभिनेत्री सोनी राजदानच्या आनंदाला थारा नव्हता. आलियाचे दिया मिर्झासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही अभिनंदन करत आहेत

आलिया बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे
आपल्या मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना, आई सोनी राजदान यांनी कमेंट करत लिहिले, “ताडाआ.” चाहतेही आलियाचे जोरदार अभिनंदन करत आहेत. आलिया भट्टला हा सन्मान ‘टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड’ सोहळ्यात देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी सिंगापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटाने केली दमदार कमाई
अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर व्यतिरिक्त आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये शाहरुख खानही एका खास कॅमिओमध्ये दिसला. या चित्रपटाने जगभरात चांगली कमाई केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडं अन् आईच्या शुभेच्छा दुसरीकडं; रणबीरचे गोडवे गात म्हणाल्या, ‘शक्ती अस्त्र’

‘कोड नेम तिरंगा’मध्ये दिसणार परिणीतीच्या एक्शनची धमाल, अंगावर काटा आणणारा ट्रेलर पाहाच

हे देखील वाचा