सध्या टेलिव्हिजनवरील प्रदर्शित होणारा ‘झलक दिखला जा‘ हा लोकप्रिय कार्यक्रम चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. झलक दिखला जा हा कार्यक्रम 5 वर्षानी चाहत्यांना भेट देत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता आवर्जून कार्यक्रम पाहणार. यामध्ये काही डान्सचे व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पुन्हा एकदा एका लावनाचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही(Nora Fatehi) या अभिनेत्रीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. तिचा डान्सचा कोणताही व्हिडिओ समोर आला की, चाहते तो पाहिल्याशिवाय राहत नाही. नुकताच नेरा फतेहीच पुन्हा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. यामध्ये ती धमाकेदार डान्स करुन चाहत्यांचे मन जिंकतेच आणि माधुरी दीक्षितचीही शिट्टी वाजवली.
नुकताच ‘झलक दिखला जा'(Jhalak Dikhlaja) या कार्यक्रमाचा प्रोमो चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचे परिक्षण करण जोहर(Karan Johar), माधुरी दिक्षित(Madhuri Dixit )आणि नोरा फतेही करत आहेत. या कार्यक्रमाचा कलर्स टीव्हीने एक प्रोमो व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टग्रमा अकाउंटवर शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित नोरा फतेहीला म्हणते की, मला नोराला लावनी डान्स करताना पाहायच आहे, मग काय नोरा फतेही अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar) सोबत धमाकेदार डान्स करते.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये नोरा मराठमोळ्या अवतारात दिसून येत आहे. नोरा आणि अमृता खानविलकर ‘आता वाजले की बारा’ या गाण्यालर ठसकेबाज लावनी करताना दिसून येत आहेत. यामध्ये नोराने हिरव्यारंगाची नऊवारी साडी, नाकात नथ आणि गळाभरुन दागिने घातले आहेत. नोरा मराठमोळ्या अंदाजात खूपच सुंदर दिसत आसून तिने लावनीही तेवढीच भारी केली आहे. नोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धमाल करत आहेत. तसेच कार्यक्रमाचा प्रोमो पाहून चाहतेही या आठवड्यातील भाग पाहण्यासाठी खूपच उत्सकतेने वाट पाहात आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
फ्लॉप चित्रपटांमुळे घाबरला आयुष्मान; मानधनात केली मोठी कपात, एका चित्रपटासाठी घेणार ‘इतके’ कोटी
गुन्हा कबूल करणार की नवा डाव खेळणार? ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा थरारक टिझर आला समोर
प्रदर्शनाआधीच ‘पोन्नियिन सेल्वन -1’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, थिएटर मालकांना मिळाली धमकी