चित्रपट दुनियेतील अशा झगमगणाऱ्या दुनियेत प्रत्येक सेलिब्रिटीची छोट्यातील छोटी गोष्ट कॅमेरामध्ये उतरवली जाते त्यामुळे त्यांना सतत कॅमेराचा सामना करावा लागत असतो. बॉलिवूड सेलिब्रिटीसाठी हे खूपच कठीण काम आहे. जर तुम्ही एक स्टार असाल तर तुम्ही कॅमेऱ्यासमोर वक्तव्य करत असताना दहावेळा विचार करुनच बोलावे लागणार आहे. जर सेलिब्रिटींनी असे नाही केले तर त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. कधी कधी काही सोलिब्रिटी एवढे विनोदी वक्तव्य करतात की, लोक वर्षानु वर्षे त्याच्यावर हसत असतात. एकदा आलिया भट्टने (Aliya Bhatt) पृथ्वीराज चव्हान यांना पंतप्रधान बनवले होते. तिच्या या वक्तव्यामुळे ती खूप ट्रोल झाली होती. हे पहिल्यांदा घडले नाही, असे अनेक सेलिब्रिटींसोबत झाले आहे. आज आपण अशाच कलारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत जे आपल्या वक्तव्यांमुळे खूपच चर्चेत आले होते.
वरुण धवन
अभिनेता वरुन धवन (Varun Dhawan) याला इंडस्ट्रीमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते त्याने बॉलिवूड मध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट केले आहे. तो नेहमी आपल्या विनोदी अंदाजाने आपल्या आजूबाजूच्या लोकांना हसवत असतो. पण त्याने कधी विचारच केला नव्हता की, त्याच्या अशा विनोदाला ला ट्रोलिंगचा सामना करावा लागेल. एकदा दिलवाले (Dilvale) टचित्रपटाच्या प्रमोशनसाठी काजोल (Kajol), क्रिती सेनन (kriti sanon), शाहरुख खान (Sharukh Khan) आणि वरुन एका कार्यक्रमामध्ये गेले होते. तेव्हा वरुनला प्रश्न वाचारला होता की, दिलवाले चित्रपट चालेल का? तेव्हा वरुनने मजाक मध्ये उत्तर देत सांगितले होते की, “तुम्ही इंसेप्शन चित्रपट पाहिला आहे?, तो तुम्हाला समजला?, आवडला?, तर मग दिलवाले पण चित्रपट आवडेल.” जे लोकांना आजिबात समजले नाही.मात्र, अशा उत्तरामुळे वरुनला खूप ट्रोल केले होते.
रणबीर कपूर
काही दिवसांपासून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) चित्रपट ब्रह्मास्त्रमुळे खूपच चर्चेत आहे. रणबीरला भारतीय प्रसिद्ध अभिनेतांपैकी एक मानले जाते. त्याचे आयुष्य आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे वादविवादाच्या आजूबाजूने गेले आहे. त्यामुळे तो वादापासून ते आपल्या वक्तव्यामुळे देखिल खूपच चर्चेत राहिला होता. एकदा ऑस्करसाठी त्याचा चित्रपट बर्फी नाकारले होते तेव्हा त्याने ऑस्कर कमीटीला सडेतोड उत्तर दिले होते की, “हे ऑस्करचं दुर्भाग्य आहे जे त्यांनी ‘बर्फी’ चित्रपट नाही निवडला.”
करिना कपूर खान
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिला गॉसेप क्वीन म्हणून देखल ओळखले जाते. करिना नेहमी कॅमेरासमोर असे काही बोलून जाते की ती चर्चेचा विषय बनते. तिने ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलत अताना सांगिकले होते की, “कोणतीही अभिनेत्री 10ृ15 वर्षाची असताना अशी भूमिका पार पाडू शकली नसती.”तिच्या या वक्तव्यामुळे तिला खूपच ट्रोल केले होते.
बिपाशी बसू
अबिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) मूळची कोलकत्ताची असून तिने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमद्ये हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी जागा बनवली आहे. या अभिनेत्रीने मीडियीला उत्तर देत असताना चुकिचे उत्तर दिले होते. तिला विचारले होते की, ऑलम्पिक खेळ कोणी सुरु केले आहे? या प्रशनाचे अत्तर देत असताना तिने सांगितले होते की, “मला वाटत आहे की, एडोल्फ हिटलर याने सुरु केले होते,… हा हे बरोबर आहे त्यांनीच सुरु केले होते.” तेव्हा तिला तिचे जनरल नॉलेज कमी असल्याचे सांगितले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! बाॅलिवूडला हादरा! प्रख्यात अभिनेते अरूण बाली काळाच्या पडद्याआड
बऱ्याच काळापासून गायब असणारा इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे तरी कुठे?