‘मुलगी सोहा अली खान अन् सुन करिना कपूरमध्ये काय फरक आहे?’ शर्मिला टागोर म्हणताय, करिना…

what is the difference between daughter and daughter in law sharmila tagore gave a brilliant answer of this question to kareena kapoor


सासू-सून यांचे नाते खूप नाजूक असते. या नात्याला जपणे ही काही सोपी गोष्ट नाही. पण जर पतौडी घराण्याची सून करीना कपूर बद्दल बोलायचे झाले, तर तिचे सासू शर्मिला टागोर यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत.

या दोघी क्वचितच सोबत दिसतात पण जेव्हा त्यांना एकत्र पाहिले जाते, तेव्हा त्यांच्यातील प्रेम स्पष्टपणे दिसून येते. त्याचवेळी, शर्मिला टागोर यांना मुलगी व सून यांच्यातील फरक विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने याचे उत्तर दिले.

जेव्हा शर्मिला टागोर करीना कपूरच्या रेडिओ शो ‘व्हॉट वूमेन वॉन्ट’मध्ये अतिथी म्हणून आल्या, तेव्हा स्वत: करीनाने त्यांना हा प्रश्न विचारला होता. तिने तिच्या सासूला विचारले, की मुलगी व सून यांच्यात काय फरक आहे?

मग शर्मिलाजी म्हणाल्या,” आपली मुलगी आपण स्वतः वाढवतो. तेव्हा आपल्याला माहीत असते की तिला कसे समजून घ्यावे किंवा कसे समजून सांगावे. परंतु सून ही दुसर्‍या घरातून येते. तेव्हा तिच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. अशा परिस्थितीत, सूनेला आरामदायी वातावरण मिळणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरुन तिला तिच्याच घरासारखे वाटले पाहिजे आणि मग ती घरातील सदस्य बनते.”

शर्मिला टागोर यांनी या मुलाखतीत असेही सांगितले की, ‘मुलगा व सून यांच्या कामात जास्त हस्तक्षेप करणे योग्य नाही. त्यांना त्यांच्यानुसार त्यांचे जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे.”

शर्मिला स्वत: करीना आणि सैफ बद्दल कधीच बोलत नाहीत. म्हणूनच करीना आणि शर्मिला एकमेकांच्या खूप जवळ आहेत. शर्मिलाजींनी बऱ्याच वेळा सून करीनाचे कौतुक करत असतात. विशेषत: त्यांना आवडणारी करीनाची एक सवय म्हणजे जेव्हा शर्मिलाजी तिला मेसेज करतात, तेव्हा करीना लगेच उत्तर देते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कष्टाला पर्याय नाही’, पण काम मिळण्यासाठी हवे बक्कळ फॉलोअर्स; असे आम्ही नाही तर सांगतेय ‘ही’ अभिनेत्री

-मूर्ती लहान पण कीर्ती महान! वयाच्या चौथ्या वर्षी बनला होता ‘डीजे’, पाहा व्हायरल होणारा आर्चचा व्हिडिओ

-तापसी पन्नूचं ‘आयटम साँग’ पाहिलंय का? व्यंकटेशच्या चित्रपटात दिसली होती बोल्ड रूपात, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.