Friday, April 3, 2026
Home बॉलीवूड आलियाने आई होण्याआधीच केले स्टार्टअप सुरू, यूएई ते युरोपपर्यंत विस्तार करण्याची योजना

आलियाने आई होण्याआधीच केले स्टार्टअप सुरू, यूएई ते युरोपपर्यंत विस्तार करण्याची योजना

बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या अभिनयामुळे आणि साैंदर्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री साेशल मीडियावर सक्रिय असुन चाहत्यांच्या संपर्कात असेत. आलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पाेस्ट शेअर केली आहे. जे तिच्या व्यवसायाशी संबंधीत आहे. अभिनेत्री तिच्या फॅशन डी2सी (डायरेक्ट टू कन्झ्युमर) स्टार्टअप ‘एड-ए-मम्मा’ चा व्यवसाय पुढील वर्षी संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि युरोपमध्ये विस्तारण्यासाठी काम करत आहे.

आलिया (alia bhatt) हिने गुरुवारी (दि. 13 ऑक्टाेबर) सांगितले की, “ऍड-ए-मम्मा हा मुलांसाठी परवडणाऱ्या किंमतीत कपडे उपलब्ध करून देणारा तिचा पहिला उपक्रम आहे.” ती म्हणाली की, “मला भारताबाहेर विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि या ब्रँडमध्ये आणखी विविधता जोडायची आहेत.”

आलिया म्हणाली, “आम्ही मुलांच्या कपड्यांच्या ब्रँडसह सुरुवात केली आहे आणि यावर्षी ‘मेटरनिटी’ पोशाख सादर करणार आहोत. पुढील दोन ते तीन वर्षात कुटुंबांशी संबंधित श्रेणींमध्ये अधिक ऑफर करण्याची आमची योजना आहे.” ऑक्‍टोबर 2020 मध्‍ये एड-ए-मम्‍मा सुरू झाला. या ब्रँडची उत्पादने फर्स्टक्राय, अजियो आणि मिंत्रा सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकली जातात. आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या योजनांबद्दल आलिया म्हणाली की, “यूएई आमच्या यादीत सर्वात वर आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

ही याेजना पुढील वर्षापर्यंत सुरु हाेईल, त्यानंतर त्याचा  युरोपमध्ये विस्तार करेल आणि मग ते जगभरात पोहोचेल. आलिया भट्टने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंमध्ये आलिया भट्ट बेबी बंप दाखवत आहे. आलिया भट्टने यावर्षी एप्रिल महिन्यात अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले होते. यानंतर जून महिन्यात तिला तिच्या प्रेग्नेंसीची माहिती मिळाली. हे वर्षही आलियासाठी खूप खास ठरले आहे.

यावर्षी आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. यासोबतच आलिया या वर्षी आई होणार आहे. नुकतीच आलिया भट्टच्या घरी बेबी शॉवर पार्टी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात आलियाच्या प्रेग्नेंसीबद्दल तिचे कुटुंबीयही उत्सुक आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
करीनाने जाेया अख्तरचा केला अपमान; म्हणाली, ‘तू बनू नाही शकत डायरेक्टर’ शाहरूखने घेतला पुढाकार
उर्फीच्या पार्टीमध्ये पाेहचला एक्स बाॅयफ्रेंड,अभिनेत्रीने शेअर केली भन्नाट पाेस्ट

हे देखील वाचा