Friday, March 20, 2026
Home टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्म’हत्या, प्रेमप्रकरणातून आयुष्य संपवल्याचा संशय

अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्म’हत्या, प्रेमप्रकरणातून आयुष्य संपवल्याचा संशय

गेल्या काही दिवसांपासून फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून एकामागून एक सेलिब्रिटींच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येनं सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

अभिनेत्री वैशाली ठक्कर (vaishali thakker) हिने  फाशी घेण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिली होती. जे पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र, या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पोलिसांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याच्या संशयावरून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असल्याचं बोललं जात आहे.अभिनेत्रीने इंदूरच्या साईबागमध्ये राहत्या घरी गळफास लावून घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

वैशालीची बातमी ऐकून तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर चाहते वैशालीच्या जाण्याने दु:ख व्यक्त करत आहेत. या घटनेमागील सत्य जाणून घ्यायचे आहे की वैशालीने असे पाऊल कशामुळे उचलले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

वैशालीने टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही केले काम
वैशाली ठक्कर प्रसिद्ध शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये संजनाची भूमिका साकारताना दिसली आहे. या शोमधून तिला बरीच ओळखही मिळाली. या शोनंतर ती ‘ये वादा रहा’, ‘ये है आशिकी’, ‘ससुराल सिमर का’, ‘सुपर सिस्टर’, ‘लाल इश्क’ मध्ये दिसली हाेती. वैशाली शेवटची 2019च्या ‘मनमोहिनी’ शोमध्ये देखील दिसली होती. वैशालीने टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. वैशाली ही मूळची उज्जैनमधील महिदपूरची आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ‘रे रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्म’हत्य
‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांना बिग बींच्या मुलाला बनवायचे होते जावई, पण ईशाने ‘या’ कारणामुळे दिला नकार

हे देखील वाचा