Monday, July 1, 2024

मोठी घोषणा! राज ठाकरे छत्रपती शिवरायांवर बनवणार सिनेमा, 3 भागात होणार रिलीज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी प्रदर्शित होणाऱ्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला आपला आवाज दिला आहे. हा चित्रपट मराठी, हिंदीसह एकूण पाच भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपट निर्मितीत दिलेल्या याेगदानाबद्दल लाेकप्रिय अभिनेता सुबाेध भावे याने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे अनेक विविध विषयावर बाेलले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तीन भागाच्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, या चित्रपटाचे निर्मिती काेण करत आहे? हा चित्रपट कधी प्रदर्शित हाेणार आहे? या विषयावर राज ठाकरे यांनी बाेलणे टाळले. प्रकल्प पुर्ण झाला की, याविषयावर सविस्तर बाेलुयात असे राज ठाकरे यांचे मत हाेते.

शिवाजी महाराज यांच्या जीवनावर बाेलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले की, “शायिस्तेखान, अफजलखान, पावनखिंडीत सापडणे, पन्हाळगडावरून निघून विशाळगडावर जाणे, आग्र्याहून सुटका या चार-पाच विषयांपलीकडेही छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या चार- पाच प्रसंगात वगळले तर शिवाजी महाराज यांच्यावर आपण अन्याय करत आहोत, त्यामुळे आपण त्यांच्यावर टीव्ही मालिका करायला हवी, असे मला वाटते.”

राज ठाकरे म्हणाले की, “या विषया संदर्भात मी आशुतोष गोवारीकर यांच्याशीही बोललो. एके दिवशी नितीन चंद्रकांत देसाई आमच्यासोबत होते. नीतननेही टीव्ही मालिका करण्याची तयारी दाखवली. मी त्यांना हाेकार दिला आणि पुढे नितीन यांनी सिरीजची निर्मीतीत केली.” ही सिरीज फार वर्षांनपुर्वी येऊन गेल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मात्र आता सगळेच मंच बदलले आहेत. सिनेमा निर्मितीचे सूत्र बदलले आहे. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर सिनेमा निर्मिती करण्याचा विचार सुरू आहे. मी हे काम कोणाकडे दिले आहे, याविषयी अधिक माहिती देणार नाही. मात्र, हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा या विषयावर आपण सविस्तर बोलूया.”

राज ठाकरे यांनी आवज दिलेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाविषयी बाेलायचे झाले, तर हा चित्रपट 25 ऑक्टाेबरला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. चित्रपटात सुबाेध भावे व्यतिरिक्त अमृता खानविलकर, शरद केळकर, शरद पोंक्षे हे देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘लेक जान्हवीची श्रीदेवीशी तुलना करणे योग्य नाही’, बाेनी कपूरची लाेकांना खास विनंती

आतुरता संपली! ‘मनिके’ गाण्याचं हिंदी व्हर्जन रिलीज, सिद्धार्थ अन् नाेरावर काैतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा