बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि लाेकप्रिय अभिनेत्री करीना कपूर आपल्या मुलांना तायक्वांदोच्या एका सामन्यात चिअर करण्यासाठी गेले होते. शाहरुख खान संपूर्ण कुटुंबासह अबरामला प्रोत्साहन करण्यासाठी आला होता. रविवारी (दि. 16 ऑक्टाेबर)राेजी अबरामला तायक्वांदोचा सामना जिंकताना पाहण्याची संधी त्यांना मिळाली. सामन्यादरम्यान इतर अनेक कलाकारांची मुलेही उपस्थित होती.
शाहरुखने दिले मुलाला सुवर्णपदक
शाहरुख खान (shah rukh khan) याने मरून रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचा पँट परिधान करून कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सामन्यादरम्यान अबरामने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला. यानंतर शाहरुख खानला स्टेजवर बोलावण्यात आले जेणेकरून तो आपल्या मुलाला सुवर्णपदक देऊ शकेल. पुरस्कार जिंकल्यानंतर अबरामने आनंदात वडिलांच्या गालावर किस केले.
View this post on Instagram
सामन्यादरम्यान हाेते शाहरुखची दाेन्ही मुल उपस्थित
यावेळी शाहरुख खानची दोन मुलं आर्यन आणि सुहानाही उपस्थित हाेते. दोघेही ट्रेनरसोबत पोज देताना दिसले, ज्यांनी या दोघांना देखील शिकवले होते. त्याच वेळी, सर्व मुलांचा एक फोटो देखील दिसत आहे, ज्यामध्ये करीना कपूर, शाहरुख खान यासारख्या कलाकारांच्या मुलाचा समावेश आहे.
करिश्मा कपूरच्या मुलाचाही स्पर्धेत समावेश
यावेळी सैफ अली खान आणि करीना कपूर देखील त्यांचा मुलगा तैमूर अली खानसोबत सामना बघायला आले हाेते. करिश्मा कपूरचा मुलगाही या स्पर्धेत सहभागी झाला होता. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यानंतर शाहरुख ‘जवान’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तो ‘डंकी’ या चित्रपटातही दिसणार आहे. शाहरुख खानच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
मोठी घोषणा! राज ठाकरे छत्रपती शिवरायांवर बनवणार सिनेमा, 3 भागात होणार रिलीज
‘लेक जान्हवीची श्रीदेवीशी तुलना करणे योग्य नाही’, बाेनी कपूरची लाेकांना खास विनंती