बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून धक्कादायक वृत्त समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे. यानंतर त्यांच्या या ट्वीटवर लवकरात लवकर बरे होण्यासाठी चाहत्यांसोबतच कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत.
त्यांनी शुक्रवारी (२६ मार्च) रात्री ट्वीट करत लिहिले की, “दुर्दैव, मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मागील १० दिवसांपासून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहे, त्यांनी कृपया स्वत: ची कोरोना चाचणी करून घ्या.”
Unfortunately, I have tested positive for COVID-19. All those that have come in contact with me in the last 10 days are requested to please get themselves tested.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 26, 2021
विशेष म्हणजे यापूर्वीही अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये आमिर खान, आर माधवन, रणबीर कपूर, नीतू कपूर, संजय लीला भन्साळी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची पुष्टी त्याच्या प्रवक्त्याने केली होती. त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, “आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते सध्या आपल्या घरामध्येच क्वारंटाईन झाले आहेत. तसेच सर्व नियमांचे पालन करत आहेत. त्यांची तब्येत ठीक होत आहे. जो कोणी व्यक्ती नुकताच त्यांच्या संपर्कात आला आहे, त्याने स्वत: ची कोरोना चाचणी करून घ्यावी. तुम्हा सर्वांच्या चिंता आणि आशीर्वादासाठी धन्यवाद.”
परेश रावल यांनी सन १९८५ साली आलेल्या ‘अर्जुन’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी सन १९८६ साली केलेल्या ‘नाम’ या चित्रपटाने त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली होती. त्यांनी आतापर्यंत २०० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यादरम्यान त्यांना अनेक मोठ्या कलाकारांची साथ लाभली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठी बातमी! आमिर, माधवननंतर आता मिलिंद सोमणही कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली माहिती
-आमिर खाननंतर आता आर माधवनही झाला कोरोना पॉझिटिव्ह, अभिनेत्याने मजेशीर अंदाजात दिली माहिती










