डान्सिंग क्वीन सपना चौधरी कधी तिच्या डान्समुळे तर कधी तिच्या लूकमुळे सतत साेशल मीडियावर चर्चेत असते. सपना कायमच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करताना दिसते. अशातच पुन्हा एकदा सपना चौधरीने तिच्या एका पोस्टमुळे साेशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामध्ये ती ट्रॅक्टरवर बसून डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल हाेत आहे. चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सपना चौधरी (sapna choudhary) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सपना चौधरी तिचा नवरा आणि गायक वीर साहूच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पक्का हरियाणा का’ या गाण्यावर ट्रकवर बसून डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सपनाचा लूक खूप सुंदर दिसत आहे. सपनाने ब्लू कलरचा प्रिंटेड सलवार सूट घातला आहे.
View this post on Instagram
सपना चौधरीने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हॅप्पी हरियाणा डे’. सपनाच्या या व्हिडिओवर युजर्सच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. युजर्स सपनाच्या या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “आम्ही तुमच्या स्टाइलचे वेडे आहोत.” तर दुसर्या युजरने लिहिले की, “हरियाणा नंबर 1”. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “तुम्ही हरियाणाची शान आहात.”
View this post on Instagram
चाहत्यांना सपना चौधरीची देसी स्टाईल खूप आवडते. आजकाल सपना चौधरी तिचा नवरा वीर साहू यांच्या गाण्याचे जबरदस्त प्रमोशन करत आहे. नुकतेच रिलीज झालेल्या ‘पक्का हरियाणा का’ या गाण्यावर ती जोरदार रिल बनवत आहे. याआधीही त्याने ब्लॅक क्रॉप टॉप आणि स्किन कलर जीन्समध्ये या गाण्याचा रील शेअर केला होता, ज्याला खूप पसंती मिळाली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या दबंग खानला जिवे मारण्याच्याच्या धमकीमुळे एनआयनं दिली वायप्लस सुरक्षा
भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडचा कार अपघात, रुग्णालयात उपचार सुरु