बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा ‘मिली‘ चित्रपट रिलीज झाला आहे. जान्हवीचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी चित्रपटसृष्टीतील सर्व दिग्गज उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा देखील सोनेरी-पांढऱ्या रंगाच्या साडीत नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होत्या. श्रीदेवीची मुलगी जान्हवीला एथनिक आउटफिटमध्ये पाहून रेखाने खूप प्रेमाचा वर्षाव केला आणि पॅपराझींनी हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर शेअर केले, जे पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाले.
‘मिली’च्या स्क्रिनिंगमध्ये रेखा (rekha) यांना जान्हवी (janhvi kapoor) हिला एथनिक पोशाखात पाहून आनंद झाला आणि त्यांनी जान्हवीला आनंदात मिठी मारली. यावेळी जान्हवीने पीच रंगाचा शरारा ड्रेस परिधान केला हाेता. मात्र, रेखाची स्टाईल लोकांना खूप आवडली. इतकेच नाही तर रेखाचा ग्रेसफुल लूकही लोकांना भुरळ पाडत होता. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रेखाचे कौतुक करायला सुरुवात केली.
स्क्रिनिंगच्या वेळी रेखाला पाहून एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, “ती कधीच म्हातारी होणार नाही माशाअल्ला, किती सुंदर आहे ती”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले “वाह रेखा, स्टनिंग ब्यूटी तर बघा जरा’ तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिले “रेखाचे सदाबहार सौंदर्य बॉलीवूडच्या सर्व अभिनेत्रींन समोर अपयशी ठरले आहेत.”
View this post on Instagram
‘मिली’ रिलीज होताच जान्हवी कपूरच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. अभिनेत्रीने नुकतेच सांगितले की, “बाबांसोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे माझे काम त्यांच्यासाठी चांगले व्हावे अशी माझी इच्छा आहे. या दबावामुळे माझी चिंता थोडी अधिकच वाढली आहे.”
जान्हवी कपूरला तिच्या ‘मिली’ चित्रपटाकडून खूप आशा आहेत. रिलीजपूर्वी अभिनेत्रीने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. निर्माता बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी जान्हवीने 2018 मध्ये शशांक खेतानच्या ‘धडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ओटीटी विश्वात ‘अमोल टीव्ही’ची धमाकेदार एन्ट्री संजय पारेकर आणि सचिन पारेकरांच्या अमोल प्रोडक्शनचं नवं पाऊल
अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता मिलिंद गुरव झळकणार रूपेरी पडद्यावर