नवाब सैफ अली खान याची लाडकी लेक सारा अली खान हिने आपल्या दमदार अभिनेयाने तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयासाठी आणि फॅशेनमुळे सतत चर्चेत राहाणारी अभिनेत्री वैयक्तीक आयुष्यामुळे नेहमी प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर साराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिला भारतीय क्रिकेटर शुभमन गिल याच्यासोबत पाहिले गेले. यानंतर या जोडीला अनेकदा स्पॉट केले गेल. त्यामुळे यांच्या नात्याच्या सतत चर्चा होत आहेत. मात्र, यावर शुभमनने मौन तोडले आहे. (shubman gill reacts to sara ali khan relationship)
क्रिकेटर शुभमन गिल (Shubhman gill) याने नुकतंच एका पंजाबी चॅट शो दिल ‘दिया गल्ला’ मध्ये हजेरी लावली होती, हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम बाजवा (Sonam Bajwa) करत होती. तेव्हा तिने क्रिकेटरला प्रश्न विचारला होता की, ‘बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री कोणती?’ तेव्हा त्याने लगेच सराचं नाव घेतलं. नंतर तिने पुढचा प्रश्न विचारला की, ‘तु साराला डेट करत आहेस का?’ उत्तर देत शुभमनने सांगितले की, “कदाचित…” तेव्हा शुभमनच्या उत्तरावर खरेपणा दिसून येत नव्हता मग त्याला खरं खरं सांग असं म्हटल्यानंतर तो लाजत लाजत म्हणाला की, “सारा द सारा सच बोल दिया..शायद हां,शायद नहीं.”
शुभमनचे उत्तर बघून तर आता तुम्हीच आंदाज लावा असंच आहे. तरी त्याने पूर्ण नकारही दर्शवला नाही आणि होकारही सांगितला नाही. यापूर्वी या दोघांना अनेक वेळ हॉटेल आणि फिरत असताना स्पॉट केलं गेलं. यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा ऑगस्ट महिन्यापासून उठल्या आहेत.
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने अजूनतरी यांच्या नात्यावर काहीच प्रतिक्रिया दिल्या नाहीत. यापूर्वी अभिनेत्री साराने कार्तिक आर्यन (Kartik Aryan) याला डेट केले होते. पण काही काळानंतर यांचे ब्रेकअप झाले. आता अभिनेत्री खरच शुभमन गिलला डेट करत आहे का? याची प्रतिक्रिया साराकडूने येणे खूप महत्वाचे ठरेल
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
जरा इकडे पाहा! कपिलचा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला विकतोय शेंगदाणे
‘सेल्फी विद पीएम मोदी;’ म्हणत तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सुंदरच्या पोस्टने वेधले लक्ष