Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड लग्न साेहळा! मेहंदी फंक्शनमध्ये हंसिकाने हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत केला जाेरदार डान्स, पाहा भन्नाट व्हिडिओ

लग्न साेहळा! मेहंदी फंक्शनमध्ये हंसिकाने हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत केला जाेरदार डान्स, पाहा भन्नाट व्हिडिओ

अभिनेत्री हंसिका मोटवानी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अलीकडेच ती कुटुंबासह जयपूरला मुंबई विमानतळावर निघताना दिसली. 2 डिसेंबरपासून तिच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे, यासोबतच त्यांच्या मेहंदी सेरेमनीचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये हंसिका खूप आनंदी असून मस्ती करताना दिसत आहे.

अभिनेत्री हंसिका मोटवानी (hansika motwani) हिच्या मेहंदी सोहळ्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री सोफ्यावर हात आणि पायावर मेंदी लावून बसलेली दिसत आहे आणि हाेणारा नवरा सोहेल कथुरियाही तिच्या शेजारी बसला आहे. मेहेंदी फंक्शनमध्ये दोघेही गाण्याच्या तालावर नाचत आहेत. समारंभासाठी अभिनेत्रीने लाल रंगाचा सुंदर कुर्ता परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया 4 डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार आहेत. जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. 2 डिसेंबरपासून लग्नाचे सोहळे सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी मेहेंदी कार्यक्रम होणार असून 3 डिसेंबरला संगीत सोहळ्याचे आयाेजन केले आहे.

हंसिका मोटवानीने बुधवारी (दि. 31 नाेव्हेंबर)ला तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही फाेटाे शेअर केले हाेते,  ज्यामध्ये अभिनेत्रीचा हाेणारा नवरा सोहेल कथुरिया तिला आयफेल टॉवरसमोर प्रपोज करताना दिसला होता. सोहेल हातात अंगठी घेऊन हंसिकासमोर गुडघ्यावर बसून तिच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसला. ही फाेटाे समोर आल्यानंतर त्यांची एंगेजमेंट निश्चित झाल्याचे मानले जात होते.

हंसिका आणि सोहेलने त्यांच्या पाहुण्यांसाठी काही खास योजना आखल्या आहेत. माध्यामातील वृत्तानुसार, लग्नाच्या फंक्शनच्या मध्यभागी पाहुण्यांसाठी पोलो मॅच आयोजित केली जाईल. याशिवाय कॅसिनो थीमवरही पार्टी आयोजित केली जाणार आहे. (bollywood actress hansika motwani mehendi ceremony video actress grooves with fiance sohael kathuriya during her mehendi ceremony)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘गॅस सिलिंडरने बंगालींसाठी मासे शिजवणार का?’, परेश रावल यांचे वादग्रस्त वक्तव्य, मागितली माफी
आहा कडकच ना! रशियन महिलांवरही चढला ‘पुष्पा’चा फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा