साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुंबई विमानतळावर दिसली, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रश्मिका पॅपराझींसाेबत गप्पा मारताना दिसली. काय बाेली ती नेमकी पॅपरझीला चला जाणून घेऊया…
पॅपराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रश्मिका (rashmika mandnna) मुंबई विमानतळावर येताना दिसली. विमान प्रवासासाठी तिने काळ्या टी-शर्टसह ऑफ-व्हाइट शर्ट घातला होता. यासोबतच मास्कही लावला होता. याशिवाय अभिनेत्रीने काळ्या रंगाची स्लिंग बॅग घेतली होती. अभिनेत्री पॅपराझींच्या सांगण्यावरून पोझ देते. शिवाय विचारते, “तुम्हाला झोप येत नाही का?” यावर एका फोटोग्राफरने उत्तर दिले की, “ते झोपतात आणि इथे येतात.” तर दुसरा म्हणाला की, “आम्ही माॅर्निंगवाले आहोत.” फोटो क्लिक करताना पॅपराझी सतत अभिनेत्रीशी बोलत हाेते. दरम्यान, एका फोटोग्राफरने सांगितले की, “तू खरोखरच खूप सुंदर आहेस.” अभिनेत्रीने हसून सर्वांचे आभार मानले आणि निरोप घेतला.
View this post on Instagram
पॅपराझीनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. रश्मिकाला एका युजरने सांगितले की, “बिचाऱ्यांची झोपही पूर्ण होत नाही.” आणखी एका युजरने कमेंट करत सांगितले की, “रश्मिका खूप गोड आणि साधी मुलगी आहे.”
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने ‘गुडबाय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासाेबत अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता सारखे दिग्गज कलाकार होते. याशिवाय अभिषेक खान, एली अवराम, सुनील ग्रोव्हर आदींच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. रश्मिका यापूर्वी सीता रामम या चित्रपटात दिसली होती. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांमध्ये मिशन मजनूचा समावेश आहे, ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. (bollywood actress rashmika mandnna beautiful actress blushed video went viral)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तुनिषा शर्माचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अभिनेत्रीची आई झाली बेशुद्ध, वाचा लेटेस्ट अपडेट
‘तुला रणवीर सिंग चावला की काय?’ सिद्धार्थ जाधवच्या नवीन स्टाईलची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली