Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

Year Ender| ‘या’ 5 अभिनेत्रींना त्यांच्या प्रेग्नेंसीमुळे करावा लागला ट्राेलिंगचा सामना

सन 2022मध्ये अनेक बॉलीवूड स्टार्सच्या घरी सनई वाजली, तर अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी लहान मुलाचे  स्वागत केले. यामध्ये आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि सोनम कपूरसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. या दरम्यान, अनेक अभिनेत्रींचे कपडे पाहून चाहत्यांनी त्या प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला. या वर्षी कोणत्या अभिनेत्रींना त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल अशा अफवांना सामोरे जावे लागले? चला तर मग जाणून घेऊया…

मलायका अरोरा
अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा खान अर्जुन कपूरला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. अशा परिस्थितीत ती अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावर असते. अलीकडेच मलायका अरोराच्या प्रेग्नेंसीची बातमी एका वेबसाइटवर प्रसिद्ध झाली होती. यावर अर्जुन आणि मलायका यांनी आपापल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला हाेता.

कॅटरिना कैफ
25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमसचा सण साजरा करण्यात आला. दरम्यान, कॅटरिना कैफनेही पती विकी कौशल आणि कुटुंबासोबत ख्रिसमसचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये, अभिनेत्री कुटुंबातील सदस्याच्या मागे लपलेली दिसली. अशा परिस्थितीत, चाहत्यांनी अंदाज लावला की, ती प्रेग्नंट आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करुन तिला सतत विचारले की, “तू प्रेग्नंट आहेस का?” याशिवाय नेहा धुपियाने शेअर केलेल्या फोटोमध्येही कॅटरिना काहीशी लपून बसलेली दिसली.

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती तिच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वादात सापडली आहे. त्याचबरोबर दीपिकाच्या प्रेग्नेंसीबद्दल अनेकदा अफवा उठवण्यात आल्या आहेत. अनेकदा तिच्या कपड्यांमुळे चाहत्यांना ती प्रेग्नंट असल्याचे वाटायचे. मात्र, ती फक्त अफवा होती.

करीना कपूर
करीना कपूर नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. करिनाला दोन मुलं आहेत. तरीदेखील ती पुन्हा एकदा गर्भवती असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय आपल्या सैल कपड्यांमुळे अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावर असते. यावर्षी ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची अफवा पसरली होती, जी पूर्णपणे खोटी होती. (year ender 2022 malaika arora actress katrina kaif actress deepika kareena these actress pregnancy rumored viral in this year)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हिंदी न येणाऱ्याला बॉलिवूडमध्ये काम मिळतंय…’, शत्रुघ्न सिन्हांच्या मुलाची बॉलिवूडवर जहरी टीका
‘आम्ही आवाहन करतो की, चाहत्यांनी…’, पंतला भेटल्यानंतर बॉलिवूड दिग्गजांची कळकळीची विनंती

हे देखील वाचा