बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीमधील जोडीदार निवडले आहे. पण या कलाकारांचे नाते जेवढ्या लवकर जुळले, तेवढ्याच लवकर तुटले देखील. असंच एक बॉलिवूडमधील जोडपं म्हणजे कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर. ते दोघेही जवळपास सहा वर्ष रिलेशनमध्ये होते, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या ब्रेकअपचं कारण तर त्यांनाच माहित असेल, पण माध्यमांच्या माहितीनुसार त्यांच्या ब्रेकअपचं कारण होतं रणबीर कपूरची आई नीतू कपूर. नीतू कपूर यांना कॅटरिना कैफ आवडत नव्हती, असे सर्वत्र म्हटले जाते.
नीतू कपूर या त्यांच्या मुलाच्या आयुष्यात नेहमीच लक्ष देत असतात. त्यांच्या मुलाने कोणासोबत राहावे आणि राहू नये हो गोष्ट त्याच ठरवत असतात. नीतू कपूर यांना कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचे नाते मान्य नव्हते. ही गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा शशी कपूर यांच्या क्रिसमस पार्टीमध्ये फॅमिली फोटोमध्ये नीतू कपूर यांनी कॅटरिनाला क्रॉप केले होते.
जेव्हा कॅटरिना आणि रणबीरचा ब्रेकअप झाला, तेव्हा नीतू कपूरने एका एका मुलाखतीत सांगितले की, “प्रत्येकाचे एक स्वतंत्र आयुष्य असतं आणि त्यात मी काहीच नाही बोलू शकत.” नीतू कपूरला रणबीर आणि कॅटरिनाचे लिव्हइन रिलेशनमध्ये राहणे जास्त आवडत नव्हते. रणबीर कपूर कॅटरिनासोबत लिव्हइनमध्ये राहण्यासाठी त्याच्या आई वडिलांचे घर सोडून भाड्याच्या घरात राहायला गेला होता. ही गोष्ट नीतू कपूर यांना अजिबात आवडत नव्हती.
कॅटरिना आणि रणबीरने ‘राजनीती’, ‘जग्गा जासुस’, ‘अजब प्रेम की गजब कहाणी’, ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग










