Thursday, April 23, 2026
Home बॉलीवूड दिग्गज अभिनेते सतीश शाह यांच्यावर झाली वर्णभेदावरून कमेंट, दिले सणसणीत उत्तर

दिग्गज अभिनेते सतीश शाह यांच्यावर झाली वर्णभेदावरून कमेंट, दिले सणसणीत उत्तर

भारतीय कलाकारांसोबत परदेशात, परदेशातील एयरपोर्टवर चुकीच्या गोष्टी घडलेल्या आपण अनेकदा ऐकले आहे. कलाकारांचे नाव, त्यांचा रंग आदी अनेक गोष्टींवरून त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. यापासून लहान मोठे कोणतेच कलाकार अजूनपर्यंत वाचले नाही. असाच एक अनुभव मनोरंजनविश्वातील दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते सतीश शाह यांना आला आहे.

सतीश शाह यांचे नाव उच्चारले की डोळ्यासमोर येतात त्यांच्या कॉमेडी भूमिका. त्यांनी त्यांच्या चित्रपट आणि मालिकांध्ये अतिशय उत्तम पद्धतीने कॉमेडी भूमिका साकारल्या. आपल्या कॉमेडी टायमिंगने आणि जिवंत अभिनयाने सतीश शाह यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मागील काही काळापासून लाइमलाईटपासून लांब असलेले सतीश शाह अचानक चर्चेत आले. याचे कारण म्हणजे त्यांच्यासोबत लंडनमध्ये झालेली एक घटना.

सतीश शाह यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी त्यांना लंडनच्या हीथ्रो एयरपोर्टवर वर्णद्वेषी वरून आलेला अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, एयरपोर्टवर त्यांना पाहून एयरपोर्टच्या एका स्टाफने दुसऱ्याला सांगितले की, “अशा लोकांना देखील फर्स्ट क्लास तिकीट परवडते का?” यावर सतीश यांना त्यांना फटकारत सांगितले की, “कारण आम्ही भारतीय आहोत” हे ऐकून तिथे असलेल्या स्टाफचे तोंड बंद झाले. सध्या सतीश शाह यांचे हे ट्विट तुफान व्हायरल होत असून, त्यावरून नेटकरी त्यांचे तुफान कौतुक करत आहे.

सतीश शाह यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांची साराभाई वर्सेज साराभाई ही मालिका तुफान गाजली. यात त्यांनी साकारलेली इंद्रवधन साराभाई या भूमीने त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली. सतीश यांना आपण ‘हमशक्ल’ सिनेमात शेवटचे पहिले.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी संगीतबद्ध केलं होतं पहिलं गाणं; तर बराच रंजक होता आर डी बर्मन यांचा जीवनप्रवास
आर.डी बर्मन स्मृतीदिन : …आणि असे बनले आर.डी बर्मन ‘पंचम दा’, वाचा त्यांच्या नावामागचा किस्सा

हे देखील वाचा