कॅप्टन अमेरिका फेम अभिनेता क्रिस इवांस सध्या चित्रपटांशिवाय आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. इवांस नुकतंच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे, ज्यानंतर इवांसच्या लव्हस्टोराची सर्वत्र चार्चा पसरली आहे. त्याशिवाय अभिनेत्यीने सोशल मीडियाद्वारे त्याच्या लव्हस्टोरीबद्दल हिंट दिली आहे.
कॅप्टन अमेरिका (Captain America) फेम क्रिस इवांस (Chris Evans ) नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर चाहते अंदाज लावत आहेत की, अभिनेत्री अल्बा बपिस्ता ( Alba Baptista)
हिला डेट करत आहे. त्याशिवाय अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटमध्ये एका बाजूला इवांस तर दुसऱ्या बाजूला बपिस्ता दिसत आहे.
सांगायचे झाले तर अल्बा बपिस्ता पोर्तुगजची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात 2014 साली पोर्तुगजमधील वेब सिरिज ( Jardins Proibidos ) पासून केली होती. त्यावेळी अल्बा 25 वर्षाची होती. त्याशिवाय तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे. गेल्या वर्षी ती नेटफ्लिक्सवरील ‘वॉरिअर’ वेब सिरिजमध्ये पाहायला मिळाली. या वेबसिरिजद्वारेच अभिनेत्रीने इंग्रजी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते.

कॅप्टन अमेरिकााची भूमिका साकारणाऱ्या अभिनेताचे खरे नाव क्रिस्टोफर रॉबर्ट असं आहे. इवांस सध्या 41 वर्षाचा आहे. त्याने आतापर्यत ‘एवेंजर्स’,’कॅप्टेन अमेरिक’, आणि ‘फॉर’सारख्या गाजणाऱ्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिमानास्पद! रितेश देशमुखच्या सिनेमाने प्रेक्षकांना लावले ‘वेड, केली बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई
अमृता फडणवीसांचं गाणं पाहून देवेंद्रजींची प्रतिक्रिया; पत्नीनेन सांगितले,’ते ट्रोलिंगला घाबरले कारण…’










