Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड अजयची लेक सलवार सूटमध्ये पाेहचला सिद्धीविनायक मंदिरात, देसी स्टाईल पाहून युजर्सही अचंबित

अजयची लेक सलवार सूटमध्ये पाेहचला सिद्धीविनायक मंदिरात, देसी स्टाईल पाहून युजर्सही अचंबित

अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण अशा स्टार किड्सपैकी एक आहे, जी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच खूप चर्चेत आहे. न्यासा देवगन अनेकदा बोल्ड आउटफिट्समध्ये स्पॉट केली जाते आणि यामुळे अनेक वेळा युजर्स तिला ट्रोल करतानाही दिसतात. नुकतीच न्यासा देवगण तिची आई काजोलसोबत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी ती एथनिक सलवार सूटमध्ये दिसली. हे पाहिल्यानंतर युजर्स हैराण झाले आणि पुन्हा एकदा नेटिझन्स न्यासाच्या कपड्यांवर वेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.

जेव्हा न्यासा (nysa devgan) सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली, तेव्हा ती पांढर्‍या फुल स्लीव्ह सलवार सूटमध्ये हाेती. यासोबतच तिने मॅचिंग ओढणीही ओढली हाेती, तर अभिनेत्री काजोलने फुलांची डिझाईन असलेली कुर्ती परिधान केली हाेती आणि सनग्लास लावला हाेता. साेशल मीडियावर व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओमध्ये, कपाळावर टिक्का लावून न्यासा हातात फुलांचे पूजेचे ताट घेऊन काजोलच्या पुढे चालताना दिसत आहे. यादरम्यान काजोल कारमध्ये बसण्यापूर्वी लोकांना शुभेच्छा देताना दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने आपली प्रतिक्रिया देत लिहिले की, “यांचे काही खरं नसतं दाेन-दाेन रुप,  माय-बापासाेबत पुर्ण कपडे परिधान करुन येतात आणि मित्रांसाेबत हाफ कपडे”, तर एका युजरने ट्राेल करत लिहिले की,
“मी का हसतोय?” त्याचप्रमाणे दुसर्‍या युजरने मजेशीर प्रतिक्रिया देत ‘पू बनी पार्वती’ असे लिहिले, एका युजरने तर चक्क कमेंट करत लिहिले की, “चेहरा पाहून असे वाटते की, संपूर्ण कपडेच आवडले नाहीत.” अशा प्रकारे अनेक युजर्स भिन्नभिन्न कमेंट करताना दिसले. मात्र, काही चाहत्यांनी न्यासा देवगण हिची प्रशंसा केली. (bollywood  nysa devgan dressed up in salwar suit as she visit siddhivinayak temple with actre`s`s and mom  kajol devgan )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हीच ती नैसर्गिक सुंदरता! रश्मिकाने विमानतळावर बिनधास्तपणे काढला मास्क; पाहायला मिळाला नो मेकअप लूक

पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय शाहरूखचा लेक आर्यन? फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा