सध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधे लग्नसराईचा मौसम आल्याचे चित्र दिसत आहे. हिंदीमध्ये अनेक बडे कलाकार लगीनगाठ बांधत असताना मराठीमधील कलाकार कसे मागे राहणार मराठीमध्ये देखील अनेक कलाकार यावर्षी लग्न बंधनात अडकणार आहे. मराठीमधील सध्याची आघाडीची विनोदी अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेली वनिता खरात सर्वांनाच माहित आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतून तिने अमाप ओळख मिळवली आणि ती सर्वांच्या घरात पोहचली. वनिताने तिच्या प्रतिभेच्या जोरावर स्वतःचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. अभिनेत्रींच्या बाबतीत असणारी एक विशेष चौकात मोडत तिने या क्षेत्रात स्वतःचे नुसते स्थान निर्माण नाही केले तर मोठे यश देखील मिळवले आहे. आज विनिता खरात हे नाव कोणी ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.
View this post on Instagram
हीच वनिता खरात लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे, हे तर आता जवळपास सर्वांनाच समजले आहे. मात्र आता वनिताने तिचे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे काही प्री वेडींगचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. हे फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर एकच धमाका झाला. कारण वनिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे अर्थात सुमितचे काही बोल्ड आणि किस करत असल्याचे देखील फोटो आहे. आपल्या अतिशय बोल्ड आणि बिनधास्त स्वभासाठी वनिता ओळखली जाते. वनिताने पहिल्यांदाच असे फोटो शेअर केले असे अजिबात नाही. याआधी देखील तिने न्यूड फोटोशूट करत एकच खळबळ माजवून दिली होती.
View this post on Instagram
आता वनिताने तिचा आणि सुनीताचा शेअर केलेला एक फोटो खूपच लाईमलाइट मिळवत आहे. या फोटोमध्ये वनिता आणि सुमित ओलेचिंब होऊन किस करताना दिसत आहे. वनिताने गुलाबी साडी आणि पांढरे ब्लाऊज घातले असून, सुमितने पांढरा शर्ट घातला आहे. वनिताने २०२२ वर्षाच्या शेवटी ती आणि सुमित रिलेशनशिपमध्ये असून ते लवकरच लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये वनिता लग्न करणार असून आता तिच्या लग्नाला केवळ 11 दिवस उरले आहेत. यातच तिने शेअर केलेले तिचे आणि सुमितचे प्रीवेडींगचे फोटो सध्या जाम धमाकूळ घालत आहे.
तत्पूर्वी वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर असून, त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. सोशल मीडियावर त्यांनी एकमेकांसोबत अनेक फोटो आतापर्यंत पोस्ट केले आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खिलाडी कुमार आणि सिरिअल किसर पहिल्यांदाच एकत्र, पाहिलात का चित्रपटाचा ट्रेलर?
सुनील शेट्टीच्या दिलदार अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मनं, मराठी भाषेत म्हणाला, ‘आम्ही सर्वजण…’