बॉलिवूडमधील प्रसद्ध गायक पलाश सेन याने आपल्या गायनाने अनेक वर्ष चाहत्यांवर राज्य केलं आहे. संगिताशिवाय पलाश आपल्या फॅशनस्टाइलसाठी देखिल खूप प्रसिद्ध आहे. मात्र, पलाश त्याच्या आईची आठवण म्हणून तो नेहमी गळ्यामध्ये मंगळसुत्र घालून मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये जात असतो. यमागंच कारणही गायकाने सांगितलं आहे. त्याशिवाय त्याच्या आईने केलेल संघर्ष आणि त्याच्या आईसोबत असलेलं नातं देखिल सांगितलं.
प्रसिद्ध गायक पलाश सेन (Palash Sen) हा नेहमी आपल्या गाण्यासाठी आणि फॅशेनसाठी ओळखला जातो. स्वत: डॉक्टर असलेला पलाश हा नेहमी त्याच्या गळ्यामध्ये मंगळसुत्र घालत असतो, कारण त्याच्या आईची ही शेवटची वस्तू असल्याने तो नेहमी स्वत: जवळच ठेवत असतो एका मुलाखतीदरम्यान त्याने या मगचं कारणही स्पष्ट केलं आहे.
पलाशने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ” देशाची फाळणी झाली तेव्हा माझी आई आठ वर्षांची होती. चार वर्षांच्या भावाची काळजी घेत आठ वर्षांची ती एकटीच लाहोर ते जम्मूपर्यंत चालत आली होती. ते दोघे सीमेपलीकडून जम्मूला एकटेच चालत आले. ती खूप खंबीर होती. ती फक्त मुलं शिकत असलेल्या शाळेत गेली होती, कारण त्या वेळी जम्मू-काश्मीरमध्ये मुलींची शाळा नव्हती. ती अवघ्या 17 वर्षांची असताना तिने लखनौमध्ये एमबीबीएस करण्यासाठी तिचं घर सोडलं होतं.”
View this post on Instagram
पलाशने पुढे सांगितले की, ” जेव्हा तुम्ही इतक्या मजबूत आणि हिंमत असलेल्या पालकांच्या पोटी जन्म घेता तेव्हा, तुम्ही तसेच मजबूत होता. तुम्ही एक कठोर व्यक्ती बनता. मला वाटतं की त्यामुळेच आई आणि माझ्यामध्ये बरेच मतभेद आणि भांडणं झाली. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. तिच्याकडे एक मंगळसूत्र होतं, माझे वडील गेल्यावर तिने ते घालणं बंद केलं. मग मी ते मंगळसूत्र घालायला सुरुवात केली. मी ते प्रामुख्याने स्टेजवर घालतो, त्या माध्यमातून तिचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमीच असतो. मी खरतौश देखील घालतो. ते मी इजिप्तमधून घेतलं होतं. त्यामध्ये, माझ्या पालकांची नावं इजिप्शियन चित्रलिपीत दोन्ही बाजूला लिहिलेली आहेत.” पलाशच्या मते त्याने मंगळ सुत्र घातलं तर त्याला असे वाटते की, त्याच्या आई-वडीलांचा आशिर्वाद त्याच्याोबत आहेत.
पलाशने 2001 साली ‘फिलहाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, त्याच्या दमदार गायनाने आणि आपल्या कौशल्याच्या हिंमतीवर इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केलं. आज त्याला इंडस्ट्रीमध्ये कोणत्यीही ओळखीची गरज नाही.
हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस 16’ नंतर अब्दू रोजिक आणखी एका मोठ्या शोमध्ये करणार धमाल, वाचा सविस्तर
सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा दमदार अॅक्शन पॅक्ड टिझर प्रदर्शित










