Monday, May 4, 2026
Home बॉलीवूड हे पाहिलं का? रोमँटिक सीन करताना अर्चनाने कार्तिक आर्यनला म्हटले ‘भाऊ’, ऐकून अभिनेता थक्क

हे पाहिलं का? रोमँटिक सीन करताना अर्चनाने कार्तिक आर्यनला म्हटले ‘भाऊ’, ऐकून अभिनेता थक्क

बिग बॉस 16‘ त्याच्या फिनालेकडे वाटचाल करत आहे. अशात स्पर्धक या शर्यतीत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन त्याच्या आगामी ‘शेहजादा‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये पोहोचला. यावेळी, फिल्ममेकर-कोरियोग्राफर फराह खानही दिसली. जिने कार्तिक आर्यन आणि शोची स्पर्धक अर्चना गौतम हिला रोमँटिक सीन करायला सांगितले. पण, लवकरच हा रोमँटिक सीन कॉमेडीमध्ये बदलला.

खरं तर, या रोमँटिक सीनदरम्यान अर्चना (archana gautam) हिने चुकून कार्तिक (kartik aaryan) याच्यासाठी ‘भैय्या’ हा शब्द उच्चारला, ज्यामुळे सगळे हसले. फराहने या सीनमध्ये सांगितले की, अर्चना कार्तिकसोबत किचनमध्ये आल्याचा चहा बनवत आहे. दरम्यान, कार्तिक येतो आणि तिला कंबरेला धरतो. अर्चना म्हणते, “अहो मला सोडा नाहीतर मम्मी बघेल.” हा रोमँटिक सीन करताना कार्तिक तिला सोडण्यास नकार देतो. यानंतर अर्चना म्हणते, “भाऊ कुठल्या गेटवरून आला.”

हे ऐकून कार्तिकला धक्का बसतो आणि अभिनेत्यासोबत कुटुंबातील सर्व सदस्यही हसायला लागतात. हा रोमँटिक सीन कॉमेडी सीन व्हायला वेळ लागत नाही. अर्चना गौतमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेक युजर्स भिन्नभिन्न प्रतिक्रियाही देत ​​आहेत. काहींनी अर्चनाच्या या चुकीला गंमतीशीर म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

10 फेब्रुवारीला प्रदर्शित हाेणार ‘शहजादा’
‘शहजादा’ बद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रोहित धवनने दिग्दर्शित केला असून व्हॅलेंटाईन डेच्या अगोदर 10 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत कार्तिक सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(big boss 16 conte`stant archana gautam accidentally calls kartik aaryan bhaiya during romantic scene which turns into comedy)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल 10 वर्षानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी हलणार पाळणा, खंत व्यक्त करत म्हणाली…

लाल रंगाचा टीशर्ट आणि हातामध्ये कुत्र, खूपच रंजक आहे अनुप खेर आणि नीना गुप्ता यांची लव्हस्टोरी…

हे देखील वाचा