Monday, June 15, 2026
Home बॉलीवूड ‘खूप छान दिसते!’ ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल बनली ‘सरदारनी’, पाहा तिचा भन्नाट लूक

‘खूप छान दिसते!’ ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल बनली ‘सरदारनी’, पाहा तिचा भन्नाट लूक

‘बिग बॉस 13’ ची स्पर्धक शहनाज गिल आपल्या वेगवेगळ्या स्टाईलने आणि अंदाजाने प्रेक्षकांना आकर्षित करत असते. आजही ती प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. शहनाज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तसेच मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिचे फोटो‌ बघण्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियावर तिचा कोणताही फोटो शेअर होता क्षणी वेगाने व्हायरल होत असतो.

परंतु यावेळी तिच्या नव्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहनाजने डोक्यावर पगडी घालून तिचे एक फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे चाहते देखील या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

शहनाजने हे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. तिने डोक्यावर लाल रंगाची पगडी घातलेली आहे. या फोटोमध्ये ती सरदारनी सारखी दिसत आहे. तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये ती वेगवेगळी पोझ देताना दिसत आहे. कधी तिची पगडी बांधत आहे, तर कधी तिच्या मिश्या पिळताना दिसत आहे. तिचे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहे.

तिच्या फोटोवर चाहत्यांकडून खूपच प्रेम मिळत आहेत. तसेच सगळ्यांकडून वेगवेगळ्या तिला प्रतिक्रिया देखील मिळत आहे. एका युजरने ‘बेस्ट सरदारनी’ असे कॅप्शन देऊन तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तसेच दुसर्‍या एका युजरने अशी कमेंट केली आहे की, ‘शहनाज गिल ही प्रत्येक लूकमध्ये खूप छान दिसते.’ तसेच हार्ट ईमोजी पोस्ट करून तिचे कौतुक केले आहे.

शहनाज गिल तिच्या फिटनेस बाबतीत देखील खूप सीरियस आहे. सहा महिन्यात तिने बिना जिमचे जवळपास बारा किलो वजन कमी केले आहे. याबाबत शहनाजने सांगितले होते की, तिने जास्त काही नाही, फक्त तिच्या डायटमध्ये थोडासा बदल केला होता. ती दुपारी जेवायची तेच डिनरमध्ये देखील जेवत असे.

नुकताच काही दिवसांपूर्वी तिचा ‘फ्लाय’ म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. तिचे या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचा सगळ्यात जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्ला याने देखील तिच्या या गाण्याचे कौतुक केले होते. ती लवकरच ‘हौसला रख’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शुटिंग संपवून ती कॅनडावरून भारतात परत आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फॅन असावी तर अशी! लहानग्या चाहतीकडून राखी सावंतला १.५ लाख रुपयांचं गिफ्ट; अभिनेत्रीही झाली भलतीच खुश

-घरात शिरलेल्या गोरिलाला बाहेर काढण्याऐवजी श्रद्धा कपूरने लावले त्याच्यासोबत जोरदार ठुमके, पाहा मजेशीर व्हिडिओ

-व्हिडिओ: दिया मिर्झाने केला सावत्र मुलीचा वाढदिवस साजरा, वैभव रेखीच्या एक्स वाईफनेही लावली हजेरी

हे देखील वाचा