पंजाबी सिनेमापासून ते बॉलिवूडपर्यंत आपली जबरदस्त ओळख बनवणारा गायक बी प्राक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा त्याचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांशी संपर्कात राहतो. बी प्राकने नुकताच एका युवकाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गरीब मुलांमध्ये बर्गर वाटताना दिसत आहे. एवढेच नाही, तर तो ‘बारिश की जाए’ या गाण्यावर नाचतानाही दिसला आहे. तरुणाच्या या कामावर बी प्राक देखील खूप प्रभावित झाला आणि त्याने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.
बी प्राकने या तरुणाचा हा व्हिडिओ शेअर केला आणि त्याचे सर्वोत्कृष्ट म्हणून वर्णनही केले आहे. त्याने लिहिले, “बारिश की जाए या गाण्यावरचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ, भावा चांगलं काम केलंस तू. देव तुला आशीर्वाद देईल.”
बी प्राकने शेअर केलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच चाहते यावर जोरदार कमेंट करत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तो तरुण बर्गर आणून लहान मुलांमध्ये वाटतो. आपल्या या कामाने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. तसेेच मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुटले आहे. इतकेच नाही तर, तो मुलांसोबत फोटो देखील क्लिक करतो आणि ‘बारिश की जाए’ या गाण्यावर जोरदार डान्सही करतो.
बी प्राकचे ‘बारिश की जाए’ गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीझ करण्यात आले होते, ज्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि गायिका सुनंदा शर्माचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळाला. हे गाणे आतापर्यंत 60 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. त्याचप्रमाणे चाहत्यांनी गाण्याला खूप पसंती दिली.
बी प्राकच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने संगीतकार म्हणून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, गायकीच्या माध्यमातूनही त्याने चाहत्यांची मने जिंकली. अलीकडेच त्याला ‘तेरी मिट्टी’ या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. हे गाणे अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटातील आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर
-‘खूप छान दिसते!’ ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल बनली ‘सरदारनी’, पाहा तिचा भन्नाट लूक