Thursday, November 21, 2024
Home कॅलेंडर युवराज सिंगने हेजलच्या ‘या’ वागण्याला कंटाळून डिलीट केला होता तिचा नंबर मात्र….

युवराज सिंगने हेजलच्या ‘या’ वागण्याला कंटाळून डिलीट केला होता तिचा नंबर मात्र….

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अगदी बोटावर मोजण्याइतकेच म्हणजे एक/ दोनच सिनेमे केले असतील मात्र तरीही त्यांना तुफान लोकप्रियता प्रसिद्धी तर मिळालीच सोबतच अमाप फॅन फॉलोविंग देखील लाभली. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेजल कीच. सलमान खानच्या बॉडीगार्ड सिनेमात हेजल झळकली होती. या सिनेमात तिने करीनाच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या सिनेमामुळे हेजल मोठ्या प्रमाणात लाइमलाईट्मधे आली. हीच हेजल आज (28 फेब्रुवारी) रोजी तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. हेजलचा जन्म लंडनमध्ये झाला. तिचे वडील ब्रिटिश तर आई इंडो- मॉरिशियन हिंदू होती. तिचे खरे नाव गुरबसंत कौर आहे. हेजलने भारतीय क्रिकेट संघातील सिक्ससर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगसोबत लग्न केले. या दोघांचे लग्न सर्वांसाठीच सुखद धक्का होता. आज हेजलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया या दोघांची प्रेमकहाणी. 

हेजल आणि युवराज यांची पहिली भेट त्यांच्या कॉमन मित्राकडून झाली होती. पहिल्याच भेटीत हेजलने युवराजचे लक्ष वेधून घेतले. युवराजला हेजलसोबत बोलायचे होते, भेटायचे होते मात्र हेजलला तो अजिबात आवडत नव्हता. युवराजने तिचा नंबर मिळवला आणि तिला अनेकदा कॉफीसाठी विचारणा केली. मात्र हेजल त्याला हो तर म्हणायची आणि त्यानंतर तिचा मोबाईल बंद करून ठेवायची. असे बरेचदा झाले. अखेर चिडून युवराजने हेजलचा नंबर डिलीट केला. पुढे युवराजने हेजलला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठवली पण तिने ती स्वीकारली नाही. हेजलने साधारण तीन महिन्यांनी तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. मग पुढे या दोघांची मैत्री झाली आणि त्यांच्या हळूहळू भेटी वाढू लागल्या. हेजलला क्रिकेटमध्ये जास्त रस नसल्याने तिला युवराजबद्दल देखील जास्त माहिती नव्हती.

जशी त्यांची मैत्री वाढली तसा हेजलने देखील युवराज सिंगमध्ये रस घ्यायला सुरुवात केली. पुढे हे दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्न केले. याचवर्षी युवराज आणि हेजल आईबाबा झाले असून, २५ जानेवारी २०२२ रोजी हेजलने एका मुलाला जन्म दिला. युवराज सिंगने सोशल मेडियावरून सर्वाना याची माहिती दिली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रार्थना बेहेरेने शेअर केला १५ वर्षांनी आयुष्यात आलेला ‘तो’ अविस्मरणीय अनमोल दिवस

‘ही नव्या पुस्तकाची सुरुवात’ या सकारात्मक नोटवर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे सुंदर फोटो

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा