ग्लोबल स्टार म्हणून आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील तिने मोठे नावलौकिक कमावले. सध्या प्रियांका तिच्या बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमधील अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. चित्रपटांसोबतच ती ओटीटी माध्यमावर देखील काम करत असून, यातच तिने आता तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या सिरीजचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून, त्यावर आता नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
चालू वर्षातील प्रियांकाची बहुप्रतिक्षित वेबसिरीज म्हणून ‘सिटाडेल’कडे पाहिले जात आहे. प्रियंकाने शेअर केलेले हे फोटो पाहून या सिरीजमध्ये ती जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार हे नक्की. ‘सिटाडेल’ ही एक सायन्स फिक्शन ड्रामा सिरीज असून, प्रियांका यात एका स्पायच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमध्ये प्रियांका निभावत असलेल्या भूमिकेचे नाव नादिया असून, रिचर्ड मैडन हे मेसन केन या भूमिकेत आहे हा एक सिटाडेल एजेंट असणार आहे. प्रप्त माहितीनुसार या सिरीजच्या पहिल्या सीजनमध्ये ६ भाग असणार आहे. त्यातले २ भाग एप्रिलमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे.
View this post on Instagram
‘द रिंग्स ऑफ पॉवर’ या सिरीजनंतर ‘सिटाडेल’ ही प्राइमची सर्वात महागडी सिरीज असल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी हॉलिवूडच्या काही सूत्रांनी सांगितले होते की, ‘सिटाडेल’चे सुरुवातीचेच बजेट १६० मिलियन डॉलर होते. मात्र सिटाडेलची शूटिंग संपेपर्यंत अजून ७५ मिलियन अधिक खर्च झाले. प्रियंकाने ‘सिटाडेल’ची शूटिंग सुरु झाली असल्याची माहिती २०२१ मध्ये फोटो शेअर करत दिली होती.
प्रियांका चोप्राची ही दुसरी सिरीज असून, याआधी तिने २०१५ ते २०१८ या वर्षांमध्ये प्रदर्शित झालेल्या क्वांटिको मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तिने या सिरीजमध्ये अॅलेक्स पॅरिस ही भूमिका साकारत एका एजेंटचा रोल केला होता. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या हॉलिवूड सिनेमा असलेल्या ‘लव अगेन’चा पहिला लूक देखील प्रदर्शित केला होता. यात ती सैम ह्यूगनसोबत दिसली होती. यायाधी ती द मैट्रिक्स रिसरेक्शंसमध्ये दिसली होती. तर नेटफ्लिक्सवरचा तिचा ‘द व्हाइट टायगर’ सिनेमा देखील तुफान गाजला.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री
कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…