Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रियांका अन् निकच्या राेम्ॅंटिक फाेटाेंनी साेशल मीडियावर लावली आग, एकदा पाहाच फाेटाे

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनाससह पॅरिसच्या फ्लोरवर आपल्या जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियंका तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत असते. अशात आजच्या काळात प्रियांका ग्लोबल आयकॉन बनून एक रोल मॉडेल म्हणून जगात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता अलीकडेच प्रियांका आणि निक पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाले होते, जिथे दोघेही खूप रोमँटिक स्टाईलमध्ये दिसले.

अलीकडेच प्रियांका (priyanka chopra) हिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांसोबत काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये पती निकही तिच्यासोबत दिसत आहे. या हॉट कपलचे सुंदर फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यांना चाहत्यांनी पसंती देखील मिळत आहे. निक आणि प्रियांका पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान, हे जोडपे अतिशय शानदार आउटफिटमध्ये दिसले, ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते. एवढेच नाही, तर दोघांनी एकत्र खूप रोमँटिक पोज दिल्या आणि फोटोही शेअर केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पिंक कलरच्या प्लंगिंग नेकलाइन ड्रेसमध्ये दिसत आहे. तर दुसरीकडे, तिचा पती निक गडद रंगाच्या सूट पॅंट आणि बूटमध्ये खूप डॅशिंग दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने काही लोकांना टॅग केले आणि आम्हाला बाेलवल्याबद्दल धन्यवाद म्हटले. प्रियांका आणि निकचे चाहते त्यांच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

प्रियांका चाेप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ती लवकरच ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. जी अॅमेझाॅन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम केले जाईल. या सीरिजची निर्मिती रुसो ब्रदर्सने केली आहे. याशिवाय प्रियांका फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (bollywood actress priyanka chopra and nick jonas arrives for paris fashion week actress shares romantic pictures)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांनी इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचे सांगितले धक्कादायक कारण, एकदा वाचाच

‘शांत बसने नेहमीच…’ म्हणत नवाजुद्दीन सिद्धीकीने त्याची बाजू मांडल्यानंतर कंगना रणौतने दिले त्याला समर्थन

हे देखील वाचा