Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड विकिपीडियावर चुकीची माहिती दिल्यामुळे भडकली कंगणा, म्हणाली वेबसाईटवर डाव्यांचे नियंत्रण

विकिपीडियावर चुकीची माहिती दिल्यामुळे भडकली कंगणा, म्हणाली वेबसाईटवर डाव्यांचे नियंत्रण

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अशात अभिनेत्रीने  विकिपीडियावर एक गंभीर आरोप केला आहे. कंगनाने म्हटले आहे की, विकिपीडिया तिचा वाढदिवस आणि तिच्याबद्दल चुकीची माहिती देत ​​आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

अभिनेत्रीने स्टाेरी शेअर केली आणि लिहिले की, “विकिपीडिया डाव्या विचारांच्या ताब्यात आहे. माझ्याबद्दल चुकीची माहिती दिली जात आहे. माझ्या वाढदिवसाची तारीख पूर्णपणे चुकीची आहे. ही माहिती आपण कितीही सुधारण्याचा प्रयत्न केला तरी ती पुन्हा चुकीचीच राहते. 20 मार्च हा माझा वाढदिवस मानून अनेक रेडिओ चॅनल, फॅन क्लब आणि माझे हितचिंतक मला शुभेच्छा द्यायला सुरुवात करते.”

अभिनेत्री पुढे म्हणाली की, “माझा यावर कोणताही आक्षेप नाही, पण हे लोक गोंधळ घालण्याचे काम करतात.’ तिने सांगितले की, ‘विकिपीडिया म्हणतो की, माझा वाढदिवस 20 मार्चला आहे, पण मी माझा वाढदिवस 23 मार्चला साजरा करते. माझा वाढदिवस 23 मार्चला आहे.’ तसेच तिने लोकांना आवाहन केले आहे की, कृपया विकिपीडियावर जाऊ नका हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि तेथे दिशाभूल करणारी माहिती दिली आहे धन्यवाद!”

kangana ranaut

मंडळी, कंगना रणौत पुढील आठवड्यात तिचा 36वा वाढदिवस साजरी करणार आहे. गेल्या वर्षी अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी माँ वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते. यावेळी तिची बहीण रंगोली चंदेलही तिच्यासाेबत होती. माॅं वैष्णाेदेवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटोही शेअर केले हाेते.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री राघव लॉरेन्ससोबत आगामी ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटात दिसणार आहे. पी वासू दिग्दर्शित, ‘चंद्रमुखी 2’ हा तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट ‘चंद्रमुखी’ चा सिक्वल आहे. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत दिसले होते.(bollywood actress kangana ranaut angry over wrong information of wikipedia actress said leftists are in control)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?

स्वराच्या कव्वाली नाईट फंक्शनमध्ये पोहोचले अखिलेश यादव, अभिनेत्री पाेस्ट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा