लवकरच कोरोना काळात लॉकडाऊन झाले आणि याचवेळी एक सर्वात मोठी गोष्ट घडली आणि ती म्हणजे स्थालांतर. देशातील विविध भागांमध्ये आपले घर सोडून उपजीविकेसाठी राहत असलेल्या लोकांना या काळात रोजगार बंद झाल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या गावी, आपल्या घरी परतावे लागले होते. मात्र लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे सर्वच वाहतुकीची साधनं बंद होती, अशावेळी या लोकांनी हजारो किलोमीटर पायी चालत आपले घर गाठले.
या दरम्यान या लोकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले या विषयावर लवकरच एक सिनेमा येत आहे. या सिनेमाचे नाव आहे ‘भीड’. राजकुमार राव, आशुतोष राणा आणि भूमी पेडणेकर यांच्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन चालू आहे. याच निमित्ताने सिनेमाची संपूर्ण टीम कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी राजकुमाराने सांगितले की, शूटिंग दरम्यान आशुतोष राणा यांनी त्याला कानाखाली मारली होती.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे कपिल शर्मा शोचा. यामध्ये राजकुमार रावला कपिल शर्मा विचारतो, “या ट्रेलरमध्ये दिसते की, आशुतोष राणा तुला चापट मारतो. सीन करताना तुला वाटले नाही की ते खरंच मारू शकतात?” यावर राजकुमार म्हणतो, “त्यांनी खरंच मला हा सीन करताना मारले होते.” हे ऐकून कपिल शांत बसतो आणि आशुतोष राणा बोलायला सुरुवात करतात.
आशुतोष राणा म्हणतात, “मी मारत नव्हतो, मी म्हणालो देखील नको असे. मात्र हा खूपच प्रामाणिक अभिनेता आहे. तो म्हणाला मारा सर. मी नाही म्हटलो, तरी त्याने ऐकले नाही. मग अनुभव म्हणाले, तो ऐकत नाही तर मारा मग.” हे ऐकून आलेले सर्व पाहुणे आणि सेटवरचे लोकं जोरजोरात हसू लागले. सीन खरा वाटावा यासाठी आशुतोष राणा यांनी राजकुमाराला खरोखऱ कानफटात मारली होती. सध्या हा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे.
दरम्यान भीड हा सिनेमा येत्या २४ मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होत असून, यामध्ये कृतिका कामरा, दिया मिर्झा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाआधी राजकुमार राव ‘मोनिका ओह माय डार्लिंग’ सिनेमात दिसला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरसी 15’च्या सेटवर प्रभुदेवाने राम चरणला दिले एक खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ
कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू