बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीची लोकप्रियता आजही कायम आहे. कारण, तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे. ती आजही तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या नृत्याने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करते. तिच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. अशात वयाच्या 74 व्या वर्षी हेमा मालिनी यांनी मुंबईतील गंगा नदीवर आधारित बॅले डान्स सादर केला, ज्याने प्रेक्षक थक्क झाले आहेत.
खरे तर, मुंबईतील एनसीपीए मैदानावर हा भव्य कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. या कार्यक्रमात हेमा मालिनी (hema malini) यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. त्यांनी गंगा नदीवर आधारित बॅले डान्स सादर केला. पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या सुंदर पोशाखात अभिनेत्री हवेत तरंगताना दिसत होती. अभिनेत्रीचा डान्स पाहून ईशा देओल (Esha Deol) हिने त्यांचे खूप कौतुक केले आहे.
Watched my mum @dreamgirlhema perform Ganga on stage. Absolutely remarkable performance, visually stunning with a very strong message on our environment & river restoration. Must watch her next show. Love you mamma. #gangaballetbyhemamalini ♥️????????????♥️ pic.twitter.com/g3KaYvlTxC
— Esha Deol (@Esha_Deol) March 20, 2023
ईशाने डान्स परफॉर्मन्सदरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “मी माझ्या आईचा गंगावर आधारित डान्स पाहिला. सादरीकरण अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय होते. यातून पर्यावरण रक्षण आणि नद्यांच्या जीर्णोद्धाराबाबत एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. पुढचा शो जरूर पहा. लव्ह यू मम्मा….” ईशाने केलेली पाेस्ट साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. वयाच्या 74व्या वर्षी अभिनेत्रीचा बॅले डान्स पाहून चाहते थक्क आहेत. (bollywood actress hema malini did belly dance in mumbai)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रजनीकांत यांच्या मुलीचे लग्नातील लाखोंचे दागिने चोरीला; ‘या’ व्यक्तिवर व्यक्त केला संशय
बॉलिवूडमधील ‘या’ हिट अभिनेत्याला निर्मात्यांकडून २.६ कोटींचा गंडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल