Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘तुम्ही तीन महिन्यांची लहान बाळं आहात का?’, नव्या पिढीच्या कलाकारांवर भडकल्या रत्ना पाठक

‘तुम्ही तीन महिन्यांची लहान बाळं आहात का?’, नव्या पिढीच्या कलाकारांवर भडकल्या रत्ना पाठक

अभिनेत्री रत्ना पाठक त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाेबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. सध्या त्या त्यांच्या ‘हॅप्पी फॅमिली कंडिशन्स अप्लाय’ या वेब सिरीजमुळे चर्चेत आहेत. या सीरीजमध्ये अभिनेत्री गुजराती महिला हेमलता यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत. अशात या वेब सिरीजच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्यांनी सहाय्यकावर अवलंबून राहणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. काय म्हणाली अभिनत्री? चला जाणून घेऊया…

ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक (ratna pathak) म्हणाल्या, “मी असे अनेक कलाकार पाहिले आहेत जे विमानात कॉफी देखील विचारत नाहीत. त्यांचा सहाय्यक त्यांच्यासाठी कॉफीचा कप घेऊन येतो. तोच सहाय्यक त्यांना त्यावरच झाकण उघडून देतो. हे कलाकार त्यातून एक घोट पितात आणि तो कप पुन्हा सहाय्यकच्या हातात देतात. अरे! काय आहे हे? कोण आहात तुम्ही? तीन महिन्याचे बाळ? जरा विचार करा. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मला हे खूप धोकादायक वाटतं.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी असे अनेक कलाकार पाहिले आहेत जे अशा गोष्टींमध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sneha Menon Desai (@missusdesai)

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना गायिका बेनी दयाल यांनी रत्ना पाठक यांना सर्वोत्कृष्ट म्हटले आहे. त्यांनी लिहिले, “व्वा अप्रतिम!, तर दुसर्‍या व्यक्तीने रत्ना यांना फ्लाइटमध्ये पाहिल्याचा दावा केला आणि लिहिले, “मी एकदा फ्लाइटमध्ये त्यांच्या शेजारी बसलो होतो. एअरलाइन्स कर्मचार्‍यांशी संवाद साधताना त्या खरोखर विनम्र आणि आदरणीय व्यक्ती म्हणून समोर आल्या.” अश्या प्रकरे चाहते या व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करून अभिनेत्रीचे काैतुक करत आहेत.(bollywood actress ratna pathak befitting reply to actors who depend on assistants for coffee said this )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“रोहित सर प्रेमाने गळ घालतात” जितेंद्र जोशीने लिहिली स्कूल, कॉलेज आणि लाइफ सिनेमाच्या संदर्भात ‘ती’ खास पोस्ट

काय सांगता! अमिताभ बच्चन वयाच्या 80व्या वर्षी झळकणार रुपेरी पडद्यावर, पाेस्ट शेअर करत दिली अपडेट

हे देखील वाचा