बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही सध्या तिच्या अफेयरच्या आणि लग्नाच्या बातम्यांमुळे जोरदार चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून सतत परिणीती आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्या नात्याबद्दल बातम्या ऐकायला येत आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. या दोघांना अनेकदा पापाराझींनी एयरपोर्टवर एकत्र स्पॉट देखील केले आहे. आता या सर्व बातम्यांमध्ये परिणितीची एक जुनी मुलाखत चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यात तिने राजकारणातील व्यक्तीशी लग्न करणार नसल्याचे सांगितले होते.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये या मुलाखतीदरम्यान रॅपिड फायर फेरीत परिणीतील विचारले जाते की, तिने एका सेलिब्रिटींचे नाव सांगावे ज्याच्याशी ती लग्न करू इच्छिते. यावर तिने ब्रॅड पिटचे नाव घेतले. त्यानंतर होस्टने तिला राजकारणातील व्यक्तीसोबत लग्न करण्याचे विचारल्यावर ती म्हणते, “समस्या हीच आहे की, ती राजकारणातील व्यक्तीसोबत लग्न करू इच्छित नाही. खूप चांगले चांगले लोकं आहेत, मात्र मला कोणत्याही राजकीय नेत्याशी लग्न करायचे नाही.”
"I don't want to marry any politician. I don't want to marry any politician ever," said @ParineetiChopra in a fun #RapidFire with me a few years back https://t.co/FMThcsHIwU pic.twitter.com/eQfizKS4ja
— Faridoon Shahryar (@iFaridoon) April 2, 2023
या मुलाखतीमध्ये तिने हे देखील सांगितले होते की, तिला तिच्या जोडीदारामध्ये कोणत्या तीन गोष्टी पाहिजे. यात ती म्हणाली, “त्याने फनी मजेदार असावे, त्याने माझा आदर करावा, चांगले व्यक्तिमत्व असावे.” या दोघांच्या लग्नाबद्दल आणि नात्याबद्दल मीडियामध्ये अनेक चर्चा होत असल्या तरी त्या दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबाकडून यावर कोणतेच स्पष्टीकरण आलेले नाही.
याआधी गायक हार्डी सिंधूने एका मुलाखतीदरम्यान परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या नात्यावर भाष्य करत ते नात्यात असल्याचे सांगितले होते. यासोबतच ते लवकरच लग्न करणार असल्याचे देखील त्याने सांगितले. सोबतच आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY: विक्रांत मैसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्ही शोमध्ये निभावल्या आहेत मनोरंजक भूमिका
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज