टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता गौतम रोडे चर्चेत नाव आहे. गौतमने आजवर अनेक उत्तमोत्तम मालिकांमध्ये काम केले आहे. गौतम त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या गुड लुक्समुळे खूपच गाजत असतो. आता गौतमच्या चाहत्यांसाठी एक खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच गौतम आणि त्याची पत्नी पंखुडी आईबाबा होणार आहे. ही आनंदाची बातमी या दोघांनी अतिशय क्युट अंदाजमध्ये सर्वांना सांगितली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी फॅन्सला दिली.
गौतमने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक ऍनिमेटेड व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक क्लॅपबोर्ड दिसतो, ज्यावर लिहिलेले असते, ‘जब वी मेट पंखुड़ी अवस्थी आणि गौतम रोडे’ (जेव्हा आम्ही भेटलो) त्यानंतर प्रत्येक सीनसोबत त्यांची प्रेमकहाणी पुढच्या टप्प्यावर गेल्याचे यात दाखवले गेले आहे. यात लग्न देखील दाखवले. सर्वात शेवटच्या सीनमध्ये. त्यांचे कुटुंब आता बहरणार असल्याचे त्यांनी यात सांगितले. एक नवीन पाहुणा त्यांच्या आयुष्यात येणार असल्याचे त्यांनी या व्हिडिओमधून शेअर केले आहे.
View this post on Instagram
गौतम आणि पंखुडी या दोघांनी त्यांच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी आनंदाची बाब या व्हिडिओच्या माध्यमातून हटके स्टाइलने सर्वांना दिली आहे. सोबतच त्यांनी कॅप्शमध्ये लिहिले, “आमचे कुटुंब वाढत आहे. या नवीन टप्य्यावर जाताना आणि नवीन भूमिकेत प्रवास सुरु करण्यासाठी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहिजे.” दरम्यान त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनीता हसनंदानी, सरगुन मेहता, विवेक दहिया, अमित टंडन, रोहित पुरोहित, मानवी गागरू, गौहर खान आदी अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या दोघांची भेट ‘रजिया सुलतान’च्या सेटवर झाली होती. त्यांनी ‘सूर्यपुत्र कर्ण’ मालिकेत काम केले. त्यावेळी ते प्रेमात पडले. २०१७ साली त्यांनी साखरपुडा करत २०१८ साली त्यांनी लग्न केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY : जेव्हा चुलत बहिनीने जितेंद्र यांच्यावर लावला होता लैंगिक शोषणाचा आरोप, ऐकून सगळ्यांनाच बसला होता आश्चर्याचा झटका
Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम