Thursday, November 21, 2024
Home साऊथ सिनेमा ‘आधी साऊथ कलाकारांना डिझायनर कपडे नव्हते’ म्हणत समंथाने दिला तिच्या जुन्या दिवसांना उजाळा

‘आधी साऊथ कलाकारांना डिझायनर कपडे नव्हते’ म्हणत समंथाने दिला तिच्या जुन्या दिवसांना उजाळा

समंथा रूथ प्रभू दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साऊथसोबतच संपूर्ण देशात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिला कोणत्याही खास ओळखीची गरज नाही. उत्तम चित्रपटांमधून काम करत तिने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. तिने तिच्या करियरमध्ये अनेक मोठमोठया कलाकारांसोबत, दिग्दर्शकांसोबत काम केले. अशातच तिने नुकताच एक किस्सा तिच्या सुरुवातीच्या काळातला सांगितला जो सध्या चांगलाच गाजत आहे.

समंथाने सांगितले सुरुवातीला तिला इतर कलाकारांप्रमाणे मान दिला जात नव्हता. खूप मोठ्या काळापर्यंत हिंदी चित्रपटांना भारतीय चित्रपटांचे पिरॅमिड म्हटले जायचे. मात्र मागच्या वर्षी आरआरआर, केजीएफ-चैप्टर 2, पुष्पा या चित्रपटांनंतर मोठा बदल दिसून येत आहे. एक काळ होता जेव्हा दाक्षिणात्य कलाकारांना डिझायनर कपडे देण्यास नकार दिला जायचा. ते म्हणायचे तुम्ही कोण आहात? साऊथ कलाकार? काय साऊथ? आता आम्ही त्या स्थानी आहोत जिथे आम्ही होणे अपेक्षित आहे.

दरम्यान पुष्पा सिनेमातील समंथाच्या ‘ऊं अंटावा’ या गाण्याला लोकांनी कमालीचा प्रतिसाद दिला होता. गाण्यातील तिचा दमदार डान्स, कातिल अदा पाहून तर सर्वानाच तिची भुरळ पडली. ती ‘फॅमिली मॅन 2’मध्ये देखील दिसली होती. सध्या ती तिच्या आगामी शकुंतलं सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. हा सिनेमा १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

हृदयविकारामुळे मनोरंजन विश्वाने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही व्हाल भावूक

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा