बाॅलिवूडसह हाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीने करिअरच्या सुरुवातीला तमिळ आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सध्या प्रियांकाचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. मात्र, प्रियांकाच प्रवास इथेच थांबला नाही. या अभिनेत्रीने हॉलिवूडमध्येही चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.
प्रियांका चोप्रा (priyanka chopra) कोणत्याही मुलाखतीत बोल्डनेस आणि कॉन्फिडेंसने बोलण्यासाठी ओळखली जाते. बॉलीवूडमधील तिच्या विरोधात सुरू असलेल्या राजकारणावर ती यापूर्वी उघडपणे बोलली हाेती. तिने कुठलीही भिती न बाळगता सांगितले की, हॉलिवूडसाठी मुंबई सोडण्याचे कारण काय आहे.
या बोल्ड कन्फेशनंतर अभिनेत्रीने स्वतःशी संबंधित आणखी एक कबुली दिली आहे. तिने उघड केले की, तिने सार्वजनिकरित्या असे काहीतरी केले होते, ज्यामुळे तिला लाज वाटली आणि ती त्या घटनेला कशाप्रकारे विसरू शकते.
View this post on Instagram
माध्यमातील वृत्तानुसार, प्रियांकाला एका चॅट शोमध्ये तिच्या सर्वात लाजिरवाण्या कृतीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, ‘मी एकदा अनेक लोकांमध्ये पादली होती, त्यामुळे मला ही गाेष्ट विसारायची आहे. खरे तर, दुपारच्या जेवणाता मी मेक्सिकन फूड खाल्ले हाेते. हे कोणालाच माहीत नव्हते, त्यामुळे मी या गाेष्टीला नाकारू नाही शकत.”
प्रियांकाने परिधान केला 204 कोटींचा नेकलेस
प्रियांका चोप्रा अलीकडेच 28 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या ‘सिटाडेल’ या सीरीजमुळे चर्चेत आली होती. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्रीला या सीरीजसाठी मेल कोस्टार इतकेच पैसे मिळाले आहेत. याशिवाय मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांकाने 204 कोटींचा नेकलेस परिधान केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.(bollywood actrss priyanka chopra recalls her embarrassing moment after she had mexican food )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…
प्रतीक्षा संपली! धमाल कॉमेडी चित्रपट सासूबाई जोरात ‘या’ तारखेला हाेणार सिनेमागृहात प्रदर्शित










