रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांची लव्हस्टोरी 90च्या दशकात खूप गाजली होती. मात्र, काही कारणास्तव हे नाते जास्त काळ टिकू शकले नाहीत. अशात आजही लोकांना त्यांच्या प्रेमाच्या कहाण्या आठवतात. कारण, ब्रेकअपनंतर दोघेही कधीच एकत्र दिसले नाहीत. रवीना आणि अक्षयला पुन्हा एकत्र पाहण्याची लोकांना अपेक्षाही नव्हती. अशातच अलीकडे इतक्या वर्षांनंतर अक्षय आणि रवीना नुकतेच मोस्ट स्टायलिश अवॉर्ड 2023 मध्ये एकत्र दिसले. यादरम्यान दोघांची चांगली बॉन्डिंगही पाहायला मिळाली. एकमेकांना भेटल्यानंतर दोघेही खूप खुश दिसत होते.
यादरम्यान, अक्षय कुमार (akshay kumar) याला मोस्ट स्टायलिश मॅन 2023चा पुरस्कार देण्यात आला. ते देण्यासाठी रवीना टंडन (raveena tandon) मंचावर आली, तेव्हा अभिनेता थेट स्टेजवर पोहोचला आणि रवीनाला मिठी मारली. यानंतर रवीनाने अक्षय कुमारला हा पुरस्कार दिला. अक्षय कुमार आणि रवीना टंडनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. संवादादरम्यान अक्षय आणि रवीनाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंदही पाहायला मिळत आहे.
@akshaykumar and @TandonRaveena together at #HTMostStylishAwards show #AkshayKumar pic.twitter.com/6d5b3TUTjb
— akshaykumarnews ???? (@Akkian_Gauravv) May 8, 2023
हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर माेठ्या प्रमणात व्हायरल झाला. अक्षय आणि रवीनाला एकत्र पाहून युजर्सना विश्वास ठेवणे कठीण जात आहे. हा व्हिडिओ पाहून तर अनेकांना धक्का बसला आहे.
VIDEO : The blockbuster duo of @akshaykumar and @TandonRaveena are indeed FOREVER TRUE BLUE ROCKSTARS 🙂#AkshayKumar???? #AkshayKumar pic.twitter.com/YG6D1InsMV
— Akshay Kumar FG (@AKFansGroup) May 7, 2023
अक्षय आणि रवीना 1994मध्ये आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटात एकत्र दिसले होते. यानंतर 1995मध्ये त्यांच्या डेटींगच्या बातम्या चर्चेत आल्या. माध्यमातील वृत्तानुसार, दोघांनी मंदिरात एकमेकांशी लग्नही केले हाेते. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. खिलाडीच्या शूटिंगदरम्यान अक्षयची रेखासोबतची जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. जे रवीनाला आवडले नाही. आणि हेच त्यांच्या ब्रेकअपचे कारण होते. यानंतर रवीना आणि अक्षय कधीही एकत्र दिसले नाहीत. अशात दोघांना इतक्या वर्षांनंतर एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी खूप मनोरंजक हाेते.(after breakup bollywood actor akshay kumar and raveena tandon togather)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांद मेरा दिल चांदनी हो तुम…’, माधूरी दीक्षितचे लेटेस्ट फाेटाेशूट व्हायरल
बकेटसारखी बॅग घेऊन गेल्याने अनन्या पांडे ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, ‘तिची बॅग तिच्या संघर्षा इतकी…’