बाॅलिवूडसह हाॅसिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्राने मुलगी मालती मेरी जोनासचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये माय-लेकीची गोंडस जोडी फिरताना दिसत आहे. दरम्यान, मुलीने असे काही केले की, अभिनेत्री लेक मालतीचा व्हिडिओ शेअर करण्यापासून रोखू शकली नाही.
तर झाले असे की, प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आपल्या मुलीसोबत पार्कमध्ये फिरायला गेली होती. जिथून प्रियांकाने एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मालती स्ट्रोलरमध्ये पडली आहे, तर प्रियांका तिला फिरवताना दिसत आहे. दरम्यान मालती उत्साहात मोठ्याने हसत आहे. मुलीला असे हसताना पाहून प्रियंकाही स्वतःला रोखू शकली नाही आणि हसायला लागली. या गोंडस क्षणाचा व्हिडिओ प्रियांकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने मालतीचा चेहरा दाखवला नसला तरी पहिल्यांदाच तिने मुलीचा आवाज नक्कीच ऐकवला आहे. पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने लिहिले की, “मला सेंट्रल पार्कमध्ये आमचे फिरणे खूप आवडते.”
View this post on Instagram
प्रियांका चोप्रा नुकतीच मेट गाला 2023चा भाग बनली हाेती. जिथे ती रेड कार्पेटवरील तिच्या लूकसाठी खूप चर्चेत आली. अभिनेत्रीच्या ड्रेसपेक्षा तिच्या हिरोने जडवलेल्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांका चोप्राने पती निक जोनाससोबत मेट गाला 2023मध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान, अभिनेत्री काळ्या आणि पांढर्या रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये दिसली.
मेट गालामधील प्रियांकाच्या नेकलेसबद्दल सांगायचे झाले तर, तिच्या नेकलेसमध्ये 11.6 कॅरेटचा हिरा जडला होता. अभिनेत्रीच्या या नेकलेसची रचना बुल्गारीने केली होती. माध्यमाती वृत्तानुसार, या नेकलेसची किंमत 25 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच जवळपास 204 कोटी आहे.(bollywood actress priyanka chopra shares daughter malti marie giggling video)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकेकाळी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या अक्षय अन् रवीनाचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल
सरी या मराठी चित्रपटात वाजतंय ब्लॉकबस्टर ‘कांतरा’च्या संगीतकाराचे संगीत